प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत.

प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत.

जाणून घेवूयात प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो prasuti yojana online application. नोंदणीत बांधकामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार तर सिझेरियनसाठी २० हजार रुपये अनुदान मिळते.

हे अनुदान कसे मिळते कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो तसेच कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. हि नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अशी करा बांधकाम कामगार नोंदणी

प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज या शिवाय इतर ३२ शासकीय योजनांचा मिळेल लाभ

एकदा का तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली कि केवळ प्रसूती योजनाच नव्हे तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळू शकतो.

या योजना कोणकोणत्या आहेत हि माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुम्ही या ३२ योजनांपैकी किती योजनांचा लाभ घेवू शकतात.

बांधकाम कामगारांसाठी ३२ योजना

चला तर आता जाणून घेवूयात प्रसूती योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी काही कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असू द्या. हि कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे.

प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

त्यामुळे खालील कागदपत्रे अगोदर तुमच्याकडे स्कॅन करून ठेवा. pdf jpeg, jpg किंवा PNG format मध्ये हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. अगोदर हि कागदपत्रे आणि मगच स्कॅन करून ठेवा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा.

  • सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र.
  • प्रसूती घरी झाली असल्यास ग्रामसेवक, ग्रामपंचायत, नगरपालिका, महा नगर पालिका, जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
  • शिधापत्रिका म्हणेच राशन कार्ड.
  • स्वयंघोषणापत्र.
  • डिस्चार्ज कार्ड.

वरील सर्व कागदपत्रे २ एमबी साईजच्या आत स्कॅन करून ठेवा ऑनलाईन अर्ज करतांना हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

बांधकाम कामगारांना मिळू लागल्या पेट्या

असा करा ऑनलाईन अर्ज

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक देखील देण्यात आलेली आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही प्रसूती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे व्हिडीओद्वारे जाणून घेवू शकता.

  • गुगलमध्ये bandhkam kamgar असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
  • बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट लिंक येईल त्यावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळची वेबसाईट ओपन होईल.
  • बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर construction worker apply online for claim हा पर्याय शोध आणि त्यावर क्लिक करा.
  • select सेक्शनवर क्लिक करा आणि New claim या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका ( नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक मिळतो )
  • proceed to form या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि Validate OTP या बटनावर क्लिक करा.

योजना निवडून संपूर्ण माहिती योग्य भरा

  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज दिसेल. पेजला थोडे खाली स्क्रोल केल्यावर योजना श्रेणी निवडा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि योजना निवडा.
  • योजना श्रेणीमध्ये आरोग्य व कल्याण योजना योजना निवडा.
  • select scheme म्हणजेच योजनेच्या रकान्यामध्ये financial assistance of RS 15000 for natural delivery and RS 20000 for delivery by caesarean हा पर्याय निवडा.
  • अर्जदाराच्या मुलाचे नाव निवडा
  • मुलाचे नाव निवडल्यानंतर इतर माहिती आपोआप येईल जसे कि आधार नंबर जन्मतारीख व इतर.
  • प्रसूतीचे ठिकाण निवडा. प्रसूती रुग्णालयात झाली असेल तर रुग्णालय निवडा व घरी झाली असेल तर घर हा पर्याय निवडा.
  • रुग्णालयाचे नाव टाका.
प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज

प्रसूती योजना संदर्भात दिलेल्या पर्यायामधून योग्य ती माहिती सिलेक्ट करा

  • ज्या ठिकाणी प्रसूती झाली असेल तेथील पत्ता टाका.
  • प्रसूतीचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा जसे कि नैसर्गिक प्रसूती Natural delivery व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती Caesarean delivery.
  • जन्म प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक टाका.
  • Birth certificate म्हणजेच जन्म प्रमाणपत्र जरी करणाऱ्याचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा जसे कि महानगर पालिका, नगर पालिका किंवा ग्रामपंचायत यापैकी एक पर्याय निवडा.
  • प्रमाणपत्र जारी करणाऱ्याचे नाव टाका.
  • योजनेसाठी जि कागदपत्रे लागणार आहेत ती अपलोड करा.
  • सर्वात शेवटी submit या पर्यायावर क्लिक करा.

अशा पद्धतीने प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज दाखल करता येवू शकतो आणि यासाठी तुम्हाला १५ ते २० हजारापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

खालील सोशल मिडिया बटनांचा उपयोग करून हि माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा जेणे करून त्यांना या योजनेची माहिती होऊ शकेल आणि ते या योजनाचा लाभ घेवू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *