Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार.

Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार.

शासनाने शेतकऱ्वीयांच्जया माद्तीसास्ठी damini mobile app विकसित केले आहे जाणून घेवूयात या बद्दल आधी माहिती. कोसळून अनेक शेतकरी बांधवांचे प्राण गेलेले आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची अनेक गुरे देखील यामध्ये दगावली गेली आहे. शेतीमध्ये काम करत असतांना जर वादळी पाऊस आला तर अशावेळी वीज कोसळून शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

हि तर झाली नैसर्गिक अप्पती. शेतकऱ्यांना शेतामध्ये काम तर करावे लागणारच आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस येणारच आणि विजा कोसळणारच.

Damini mobile app शेतकऱ्यांना होणार उपयोग.

वीज कोसळून होणारे संकट आपणाला आता टाळता येणार आहे कारण शासनाने एक असे मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे ज्याचा उपयोग करून शेतकरी बांधवांना पावसाळ्यामध्ये वीज कोसळून होणारी वित्त व जीवित हानी टाळता येणार आहे.

शेतकरी damini mobile app च्या सहाय्याने वीज कोसळून होणारे नुकसान टाळू शकतात. वीज कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने हे app विकसीत केले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतकरी जीवित व वित्तहानी टाळू शकतात.

पुढील योजना पण कामाची आहे मुद्रा लोनसाठी असा करा अर्ज

Damini mobile app मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार.

damini mobile app केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर वीज कोसळण्यापूर्वीची सूचना मिळेल. शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे मित्र देखील या यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात.

तुम्ही तर तुमची नोंदंनी कराच परंतु तुमच्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांची देखील नोंदणी करा जेणे करून त्यांना देखील वीज कोसळण्याची पूर्वसूचना मिळू शकेल.

खालीलप्रमाणे करा नोंदणी करा.

या पेजच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडीओ पाहून देखील तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता.

  • तुमच्या मोबाईलमधील Google Play Store हे app ओपन करा.
  • Google Play Store च्या सर्च बारमध्ये damini lighting alert असा कीवर्ड टाका.
  • ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल डिव्हाईसमध्ये इंस्टाल करा.
  • app ओपन करा.
  • ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर काही सूचना येईल व काही परवानगी हवी असेल त्यांना तुमच्या पद्धतीने हाताळा.
  • दामिनी मोबाईल ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर खालच्या पट्टीवर काही पर्याय दिसतील, जसे की, Home, About, Instructions व register असे पर्याय दिसतील. यापैकी register या पर्यायावर टच करा.
  • तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पिन कोड, व्यवसाय याबद्दल माहिती टाका.
  • सर्वात शेवटी self व friend किंवा farmer असे दोन पर्याय दिसतील.
  • जर तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे असेल तर self या बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या मित्रांचे किंवा इतर शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे असेल तर दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा.

वरील पद्धतीने तुम्ही तुमची किंवा इतर शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता. एकदा का तुम्ही नोंदणी केली कि मग तुम्हाला वीज कोसळण्या संदर्भात सूचना मिळू शकते.

Damini mobile app

damini mobile app मध्ये वीज कोसळण्यासंदर्भात विविध सूचना.

वीज कोसळू नये किंवा कोसळल्यावर कोणते प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे या संदर्भात विविध महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचून घ्या जेणे करून तुम्हाला हि सर्व माहिती कळेल आणि वीज कोसळल्यानंतर होणारे नुकसान टाळता येवू शकतील.

अनेक शेतकरी बांधवाना amini mobile app विषयी माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालील बटणाचा उपयोग करून हि माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *