नुकतेच जन समर्थ पोर्टल jan samarth portal चे उद्घाटन करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे विविध १३ योजनाअंतर्गत लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडीओ पहा.
जन समर्थ पोर्टल वर कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे लागते या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
या ठिकाणी व्हिडीओ संदर्भ देखील देण्यात आलेले आहेत जेणे करून तुम्हाला या योजनांची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकेल त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.
विविध शासकीय योजनांची मोफत तुमच्या मोबाईलवर माहिती हवी आहे का तर मग आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा
दिनांक ६ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Iconic Week Celebrations चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ६ ते ११ जून हा आठवडा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.
jan samarth portal वर सर्व कर्जांच्या योजना एकाच ठिकाणी.
सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी आज म्हणजेच दिनांक ६ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जनसमर्थ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आहे.
जन समर्थ पोर्टलवर कर्ज घेण्याची पात्रता तपासण्यात येते. एकदा का लाभार्थी दिलेल्या योजनांसाठी पात्र झाला कि मग त्यांना कर्ज घेण्यासाठी ज्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो त्यावर रीडायरेक्ट केले जाते.
अनेक नागरिकांना कर्ज मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. हि विवंचना थांबावी व एकाच ठिकाणाहून विविध कर्ज योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने जनसमर्थ पोर्टल jan samarth portal सुरु करण्यात आलेले आहे.
jan samarth portal काय आहे जाणून घ्या.
जन समर्थ पोर्टलवर विविध प्रकारच्या १३ योजना उपलब्ध आहेत. या योजनांचे खालीलप्रमाणे प्रमुख ४ श्रेणी म्हणजेच भाग पाडण्यात आलेले आहेत.
- शैक्षणिक कर्ज.
- कृषी पायाभूत सुविधा कर्ज.
- व्यावसायिक कर्ज.
- उपजीविका कर्ज.
वरीलप्रमाणे ४ श्रेण्यामध्ये एकूण १३ योजना या ठिकाणी राबविल्या जाणार आहेत. या चार श्रेण्यापैकी एका श्रेणीसाठी किती आणि कोणत्या योजना आहेत ते जाणून घेवूयात.
jan samarth portal शैक्षणिक कर्ज श्रेणी.
शैक्षणिक कर्ज श्रेणीमध्ये खालील प्रमाणे योजना उपलब्ध आहेत.
- केंद्रीय क्षेत्र व्याज सबसिडी योजना ( csis )
- पढो परदेश Padhao pardesh – परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज सबसिडी योजना.
- डॉ. आंबेडकर केंद्रीय क्षेत्र योजना.
वरील योजनेचा लाभ विद्यार्थी घेवू शकतात. शिक्षण घेण्यासाठी या योजनेतून विद्यार्थ्यांना कर्ज मिळू शकते.
कृषी पायाभूत सुविधा कर्ज.
विकास घडवून आणण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा कर्ज श्रेणी अंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळणार आहे.
- कृषी दवाखाने आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना.
- शेती/कृषी पायाभूत सुविधा निधी.
वरीलप्रमाणे दोन योजना अंतर्गत लाभार्थींना कृषी कर्ज मिळू शकणार आहे.
पुढील योजना पण पहा शेती घेण्यासाठी मिळेल sbi कडून कर्ज
jan samarth portal व्यावसायिक कर्ज योजना
ज्यांना व्यवसाय उद्योग उभा करायचा आहे आणि त्यांना यासाठी कर्ज हवे आहे त्या संबधित विविध योजनांसाठी लाभार्थ्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
यामध्ये खालील योजनांचा समावेश आहे.
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम.
- विणकर मुद्रा योजना ज्याला wms योजना देखील म्हटले जाते.
- प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY scheme.
- पीएम स्वनिधी योजना. pm swanidhi scheme.
- सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयं रोजगार योजना.
- Stand up India योजना.
या प्रकारे व्यवसाय उद्योग उभा करू इच्छित व्यक्तींसाठी वरील योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
उपजीविकेचे कर्ज
दीनद्याल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन हि एकच योजना या श्रीनिमध्ये आहे. या योजनेचा लाभ घेण्यासठी पोर्टलवर लिंक दिलेली असते त्या लिंकवर क्लिक करून संबधित वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करवा लगतो.
jan samarth portal वर ऑनलाईन अर्ज करण्याधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का शिवाय योजनेचे स्वरूप काय आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात हि आणि इतर महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते. हि सर्व माहिती वाचल्यानंतर योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे होते.
असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
- जन समर्थ पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा
- या ठिकाणी तुम्हाला Register असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- एक चौकट ओपन होईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर व कॅपचा कोड टाका आणि get otp या बटनावर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट otp या बटनावर क्लिक करा.
- otp व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड दिलेल्या पद्धतीने टाकायचा आहे.
- पासवर्ड व्यवस्तीत टाकल्यानंतर proceed या बटनावर क्लिक करा. तुमची नोंदणी पूर्ण होईल.
योजनेसाठी कागदपत्रे आणि योग्यता
कोणत्याही योजने अंतर्गत तुम्हाला लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला jan samarth portal वर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ती सर्व डाउनलोड करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लोन घेण्यासाठी एखाद्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का हे देखील तपासले जाते. शिवाय नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. हे प्रश्न वाचल्यानंतर सर्व योजना समजून जाते.