शेतकरी उत्पादक कंपनी राशन दुकानामध्ये विकू शकेल भाजीपाला व फळे

शेतकरी उत्पादक कंपनी राशन दुकानामध्ये विकू शकेल भाजीपाला व फळे

तुमची जर शेतकरी उत्पादक कंपनी farmer producer company असेल तर तुम्हाला आता राशन दुकानामधून तुमचा माल विकत येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने जरी केलेला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीला राशन दुकानामध्ये कशाप्रकारे त्यांचा माल विकता येणार आहे, या संदर्भातील

  • शासन निर्णय काय आहे.
  • एवढेच नव्हे तर तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करायची असेल तर त्यासाठी प्रस्ताव कसा भरावा.
  • प्रस्ताव pdf फाईलमध्ये कोठून डाउनलोड करावा.
  • शेतकरी उत्पादक कंपनीला मिळणारे फायदे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार येणार आहोत.

पुढे वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपणास सूचना आहे कि विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगदी निशुल्क हवी असेल तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. जेणे करून तुम्हाला विविध शासकीय योजनांचे अपडेट मिळत राहतील.

व्हॉट्सॲपग्रुप लिंक

शेतकरी उत्पादक कंपनी संबधित शासन निर्णय बघा.

राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना राशन दुकानामधून भाजीपाला व फळे विक्रीस प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

शासन निर्णय

शेती करत असताना एकत्र येवून शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपनीला farmer producer company शासनाकडून विविध अनुदान व इतर योजनांचा लाभ मिळत आलेला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट मिळून स्थापन करता येते.

भविष्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीस खूप महत्व येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच तुमच्या परिसरातील शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हा.

तुम्हाला जर नवीन farmer producer company सुरु करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला शेतकरी गट निर्माण करावा लागतो.

शेतकरी उत्पादक कंपनी
शेतकरी उत्पादक कंपनी

त्यासाठी तुम्हाला एक प्रस्ताव कृषीविभागाकडे द्यावा लगतो. हा प्रस्ताव तुम्हाला pdfमध्ये मोफत हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. खालील लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला शेतकरी शेतकरी गटांना मिळणारे विविध फायदे व शेतकरी गट सुरु करण्यासाठी लागणारा प्रस्ताव अगदी मोफत मिळेल.

शेतकरी गट निर्माण करण्यासाठी लागणारा प्रस्ताव डाउनलोड करा.

अनेक जवळपास १५ शेतकऱ्यांच्या ग्रुप तयार करून एक शेतकरी गट निर्माण करता येतो. अशा विविध शेतकरी गटांचे एकत्रीकरण करून हि कंपनी तयार केली जाते.

शेतकरी गट pdf form download करा.

वरील प्रस्ताव डाउनलोड करून घ्या आणि त्यानुसार कार्यवाही करा.

सध्या राज्यातील मुंबई आणि पुणे अशा दोन भागामध्ये पहिल्या टप्प्यात दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवानी उत्पादित केलेला माल संबधित जिल्ह्यातील शिधावाटप दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यात येईल.

अशा पद्धतीने शेतकरी गट निर्माण करून तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकता.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी काय प्रोसेस असते ते आपण या लेखामध्ये समजून घेतलेले आहे. हा लेख आपल्या इतर शेतकरी बांधवाना जरूर शेअर करा जेणे करून त्यांना देखील या योजनेची माहिती मिळायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक