शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु असा भरा तुमचा online form.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु असा भरा तुमचा online form.

जाणून घेऊयात कि शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म shauchalay online form कसा भरावा लागतो. कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लगतो.

हि माहिती जि मिळविलेली आहे याचा संदर्भ कोणता आहे. हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म  shauchalay online form कसा भरावा लागतो हे जाणून घेण्यापूर्वी अगोदर पुढील माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियान मधून नागरिकांना सौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते.

यामध्ये शासनाचा उद्देश असा असतो कि ग्रामीण भागातील नागरिकांनी सौचालयाचा उपयोग करून आपल्या परिसरामध्ये स्वच्छता राखावी.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म माहिती.

स्वच्छता न राखल्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये खूप आजार होतात. यामध्ये नागरिकांना दवाखान्यासाठी खूप खर्च करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी सौचालय उपयोगात आणले तर रोगराई दूर जावू शकते.

ग्रामीण भागामध्ये सौचालयाचा वापर करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. ग्रामीण भागामध्ये उघड्यावर सौचास केले जाते. उघड्यावर सौचालय केल्याने आजाराची संख्या जास्त वाढते.

ग्रामीण भागातील नागरिकांनी सौचालयाचा वापर करावा यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळविण्यासाठी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा लागतो.

सौचालय अनुदान मिळविण्यासाठी अगदी घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता. याच संदर्भातील म्हणजेच शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म  shauchalay online form माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सादर केल्यास मिळेल लाभ. shauchalay online form advantage

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केलेली आहे.

ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासठी व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म साठी खालीलप्रमाणे करा नोंदणी

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म नोंदणी करणे आवश्यक आहे. सौचालय अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ देखील याठिकाणी उपलब्ध आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • पुढील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये सर्च करा  https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा डायरेक्ट पेजवर जाण्यासासाठी येथे क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही वरील वेब ॲड्रेस सर्च कराल त्यावेळी तुमच्या कॉम्पुटरवर त्यावेळी स्वच्छ भारत मिशन फेस २ Swachh Bharat Mission (G) – Phase II चा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • या ठिकाणी तुम्हाला Citizens Registration हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नोंदणी Registration form ओपन होईल त्यामध्ये पुढील माहिती भरा.
  •  तुमचा सुरु असलेला मोबाईल नंबर टाका.
  •  तुमचे नाव टाका.
  • तुमचे लिंग निवडा.
  • तुमचा पत्ता टाईप करा.
  • राज्य निवडा.
  • दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाईप करा.
  • सबमिट करा.

पुढील योजना पण बघा. या तारखेला होणार वाटप ५० हजार रुपयांचे अनुदान

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लॉगीन करा.

वरील प्रमाणे प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करता येणार आहे.

  • लॉगीन या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर टाका
  • पासवर्डसाठी मोबाईलचे शेवटचे चार अंक टाका.
  • कॅपचा कोड टाईप करा.
  • लॉगीन या बटनावर क्लिक करा.

सौचालय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि त्या नुसार अर्ज करा

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म लॉगीन केल्यावर भरावयाची माहिती.

यशस्वी लॉगीन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलण्याची सूचना येईल तो बदलून घ्या. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खालीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.

  • New Application.
  • View Application.
  • Change Password.

यापैकी New Application या पर्यायावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज ओपन होईल आता तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती त्यामध्ये भरावयाची आहे.

IHHL Application Form मध्ये खालील माहिती भरा.

  • State Name मध्ये महाराष्ट्र निवडा.
  • District साठी तुमचा जिल्हा निवडा.
  • Block Name या सदरासाठी तुमचा तालुका निवडा.
  • दिलेल्या यादीमधून तुमची पंचायत निवडा.
  • तुमचे गाव निवडा.
  • Select habitation मध्ये तुम्ही जर वाडीवस्तीवर राहत असाल तर ते निवडा किंवा तुमचे गाव निवडा.

ब या सदरासाठी शौचालय मालकाची माहिती Section B Toilet owner’s Particular

  • अर्जदाराचे आधार कार्डनुसार नाव टाईप करा. Name of the application as per Aadhar card.
  • आधार नंबर टाका आणि तो पडताळून घ्या.
  • वडील किंवा पतीचे नाव टाका.
  • अर्जदाराने तो पुरुष आहे किंवा स्त्री आहे तो पर्याय निवडावा.
  • पोट जात निवडा.
  • कार्डाचा पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील APL म्हणजेच  Above poverty line व BPL म्हणजे Below poverty line. थोडक्यात APL म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये नसलेला आणि BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असलेला. योग्य तो पर्याय निवडा.
  • मोबाईल नंबर.
  • इमेल आयडी.
  • व तुमचा संपूर्ण पत्ता टाईप करा.

अर्जदाराचे बँकेचे तपशील.

ऑनलाईन अर्ज करतांना अर्जदाराला त्यांच्या बँकेचे तपशील टाकावे लागणार आहे जेणे करून अर्जदार पात्र झाल्यास त्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात.

  • बँकेचा IFSC कोड टाका.
  • जसे हि तुम्ही IFSC कोड टाईप कराल त्यावेळी तुमच्या बँक शाखेचे माहिती आपोपाप खाली आलेली तुम्हाला दिसेल.
  • तुमचा बँक खाते क्रमांक टाईप करा. खाते क्रमांक परत एकदा टाईप करून खात्री करून घ्या.
  • सर्वात शेवटी तुमच्या बँक खात्याचे स्कॅन केलेली इमेज अपलोड करा. इमेज अपलोड करतांना लक्षात घ्या कि, साईज केवळ jpg, jpeg, png व pdf format मध्येच असावी. फाईची साईज २०० KB पेक्षा जास्त नसावी.
  • सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर Apply या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही Apply या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमचा अर्ज सादर होईल. Your application submit successfully kindly note the application no. अशी सूचना तुम्हाला दिसेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जाचा नंबर प्राप्त होईल जो कि भविष्यामध्ये तुम्हाला गरजेचा असेल.
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म

असे तपासा तुमच्या अर्जाचे स्टेट्स. Online application status

सौचालय बांधकाम अनुदानासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज तर केला आहे पण त्याची स्थिती काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला New Application. View Application. Change Password असे तीन पर्याय दिसतील त्यापैकी View Application या पर्यायावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला सिरीयल नंबर, अर्ज नंबर, अर्ज सादर झाल्याची तारीख, स्थिती, स्थिती तपासा म्हणजेच track status असे पर्याय दिसतील. त्यापैकी track status या पर्यायावर क्लिक करा.
  • track status या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला समजेल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून वैयक्तिक सौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

ग्रामीण भागातील नागरिकांनी सौचालयाचा वापर करावा यासाठी हि योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *