शेतकरी बांधवांसाठी आनंदवार्ता पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मान्सूनची आगेकूच व्यवस्थित सुरु असून ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
मान्सूनने काल संपूर्ण गोवा आणि दक्षिण कोकणामध्ये प्रवेश केला आहे. कोकणामध्ये वेंगुर्ला येथे काल मान्सूनच्या सासरी कोसळल्या असल्याची अधिकृत माहिती आहे. मान्सूनचा हा पाऊस उर्वरित भागामध्ये पोहोचण्यासाठी वातावरण पोषक असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ठ केले आहे.
पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस
मौसमी पाऊस मध्य अरबी समुद्र संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकाच्या आणखी काही भागामध्ये पुढे सरकणार असल्याचे देखील वृत्त आहे.
येत्या दोन दिवसात हा मौसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश, मध्य पश्चीम आणि वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग तसेच तामिळनाडूच्या उर्वरित भागामध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस अधिकृत माहिती पहा.
पुढील दोन दिवसामध्ये राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तासी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकरी बांधवानी शेतातील संपूर्ण कामे आटोपली असून आता केवळ पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. अशामध्ये हवामान विभागाचा हा अंदाज नक्कीच शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
पावसाचा अंदाज घेवून शेती करणे गरजेचे.
शेतकरी बांधवानी शेतीसाठी आवश्यक असणारे सर्व बी बियाणे खरेदी केले असून शेत मशागतीची संपूर्ण कामे जवळपास आटोक्यात आलेली आहे. यावर्षी हवामान अंदाज चांगला वर्तविण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
शेती करत असतांना शेतकरी बांधवानी वेळोवेळी पावसाचा हवामान अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे. पावसाचा अंदाज आल्यामुळे शेतकरी त्यांच्या पिकांचे संरक्षण करू शकतात यामुळे पिकांची हानी कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.
अधिकृत हवामान अंदाज मिळविण्यासाठी पुणे हवामान वेबसाईटला तुम्ही भेट देवू शकता. या ठिकाणी तुम्हाला अधिकृत हवामान अंदाज मिळू शकतो ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीमध्ये होऊ शकतो.
विविध शासकीय योजनांची माहितीचे अपडेट्स मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.