शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल ५० हजार रु.

शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल ५० हजार रु.

कोणत्या शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच ५१ रुपयांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल म्हणजेज दिनांक २२ जून २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

२२ जून २०२२ रोजी झाली मंत्रीमंडळ बैठक.

कालच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल ५० हजार रुपयाचा लाभ. अशा कोणत्या बँका आहेत ज्या बँकेकडून शेतकऱ्याने अल्पमुदत कर्ज घेतलेले असेल आणि त्याची पूर्णपणे परतफेड केलेली असेल तरच ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. ती माहिती खालीलप्रमाणे

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपार ५० हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी खालीलवर्षाप्रमाणे लाभ दिला जाणार आहे.

  • २०१७-२०१८
  • २०१८-२०१९
  • २०१९-२०२०

पुढील लेख पण वाचा अशी बघा तुमच्या गावाची घरकुल योजना यादी

खालील वर्षाप्रमाणे लाभ दिला जाणार आहे.

एखाद्या शेतकऱ्याने जर २०१७-१८ या वर्षात अल्पमुदत पिक कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज दिनांक ३० जून २०१८ पर्यंत पूर्णपणे त्या शेतकऱ्याने फेडलेले असावे.

शेतकऱ्याने जर २०१८-२०१९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ या दिनांक पर्यंत पूर्णपणे फेडलेले असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.

२०१९- २० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास शेतकरी ५० हजार प्रोत्साहनपर योजनेस पात्र ठरणार आहेत.

२०१९-२०  या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५०  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.

२०१९ – २० या वर्षामध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी थोडासा बदल.

२०१९-२० या वर्षामध्ये घेतलेल्या अल्प पिक कर्जमुदत संदर्भात या ठिकाणी थोडासा बदल करण्यात आलेला आहे.

तो असा आहे कि २०१९-२० या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पिक कर्ज घेतलेले असेल. त्याची पूर्णपणे फेड केलेली असेल परंतु हे अल्पमुदत पिक कर्ज ५० हजारापेक्षा कमी असेल तर अशावेळी अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रकमे एवढा प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

५० हजार रुपये प्रोत्साहन लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेतला जाईल. शेतकऱ्याने एक किंवा अनेक बँकांकडून पिक कर्ज घेतलेले असेल तर अशावेळी त्या शेतकऱ्याने घेतलेल्या पिक कर्जाची परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून जास्तीत जास्त ५० हजार रुपये एवढा लाभ दिला जाईल.

शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज

खालील बँकेकडून अल्प मुदत पिक कर्ज घेतलेले असेल तरच मिळेल या ५० हजार रुपये प्रोत्साहन योजनेचा लाभ.

  • राष्ट्रीयकृत बँका.
  • खाजगी बँका.
  • ग्रामीण बँका.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.
  • व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था.

काल म्हणजेच दिनांक 22 जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळ निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शासनाच्या महासंवाद या वेबसाईटला भेट देवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *