काय झाडी काय डोंगर आमदारांची कॉल रेकार्डिंग बनला चर्चेचा विषय.

काय झाडी काय डोंगर आमदारांची कॉल रेकार्डिंग बनला चर्चेचा विषय.

काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar  या कॉल रेकॉर्डिंगची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar काय हाटील हे एका आमदाराने हॉटेलचे केलेले वर्णन म्हणजे ते किती चैनीत आहेत चे अधोरेखित करते.

माणूस स्मशानात गेला कि त्याला आयुष्य म्हणजे क्षणिक वाटते. जीवन म्हणजे मोह माया वाटते. आयुष्यामध्ये जे काय करायचे असेल ते चांगले कर्म करावे कारण संपत्ती किंवा इतर भौतिक वस्तू एकाच ठिकाणी सोडून द्यावे लागतात आणि शेवटी एकटे यावे लागते आणि जावे देखील एकटेच लागते हे तत्त्वज्ञानाचे विचार माणसाच्या डोक्यामध्ये घोळत असतात.

याउलट तुम्ही जर पब किंवा बारमध्ये गेलात तर त्या ठिकाणी बेधुंद व बेदरकारपणे नाचणारी तरुण तरुणी बघितली अर्थात या ठिकाणची भौतिक परिस्थिती बघून आयुष्य केवळ बेधुंद जगण्यात आहे बाकी सर्व व्यर्थ आहे. पैसा असेल तर आपण काहीही करू शकतो हा विचार मनात येते.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

काय झाडी काय डोंगर फोन रेकॉर्डिंग बनला चर्चेचा विषय.

तात्पर्य मानसशास्त्राच्या नियमानुसार बहुतांशी तुमचे मानसिक आरोग्य हे तुमच्या भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्याचेच एक छान उदाहरण या ठिकाणी डेत आहोत.

निसर्गाच्या सानिध्यात माणूस गेला कि अगदी भान हरपून जाते. माणूस कितीही संकटात असू द्या, धावपळीत असू द्या झाडी, डोंगर दिसला कि मन कसे अगदी शांत होते.

सर्व संकटे थोड्या वेळासाठी थांबली जातात संकटाच्या लाटेवर बसलेला मानवी मन हळूच मानसिक हिरवळीच्या प्रदेशात प्रवेश करते आणि मग उरतो निव्वळ आनंद.

आज महाराष्ट्रामध्ये कमालीची राजकीय उलथापालथ होण्याची संभावना निर्माण झालेली आहे. अशावेळी बंडखोर आमदार बऱ्याच दिवसापासून आसाम राज्यातील गुवाहाटी येथील एका पंच तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. वास्तविक पाहता आसामची राजधानी दिसपूर असताना सध्या संपूर्ण भारतामध्ये केवळ गुवाहाटीचीच चर्चा जोरात सुरु आहे.

काय झाडी काय डोंगर कार्यकर्त्यामुळे व्हायरल.

ज्या ठिकाणी बंडखोर आमदार वास्तव्यास आहे असा एका आमदार महाशयांना एका कार्यकर्त्याने फोन केला असता त्यांनी उद्गारलेले वाक्य, त्यांची बोलण्याची लकब सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय होत आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये कधी काय लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही हा भाग वेगळा.

तर या महाशयांना एका कार्यकर्त्याने हालचाल विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनी ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या हॉटेलचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.

काय झाडी

काय डोंगर

हॉटेल

सगळे ओक्के हाय

अशी प्रतिक्रिया दिली ती अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या कामाला जर तुम्ही निघाले असाल आणि रस्त्याने मध्येच घनदाट झाली, डोंगर लागला असेल तर अशावेळी त्या प्रवाशाचे भान हरपल्याशिवाय राहत नाही. मन शांत होते, चित्त प्रसन्न होते सगळे ताण तणाव काहीवेळासाठी विसरले जातात आणि मूड एकदम फ्रेश होतो.

मोठ्या माणसांचे शौक देखील मोठेच असतात. सर्वसाधारण माणसाला मात्र याचे अप्रूप वाटते. राज्यामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न उभे ठाकले असतांना या उच्चभ्रूं नेत्यांना कसलाही फरक पडत नाही.

काय झाडी काय डोंगर

गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत बंडखोर आमदारांची राहण्याची व्यवस्था.

गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांवर खूप मोठा खर्च होत असल्याच्या बातम्या वाचण्यात येत आहे. रेडीसन ब्लू हॉटेल ज्या आजूबाजूला डोंगर, झाडी व तलाव असल्याने येथील वातावरण अगदी प्रसन्न आहे. साहजिकच येथील खर्चाचा आकडा देखील तेवढाच मोठा आहे.

सर्व सामान्य नागरिकांना जगण्यासाठी करावी लागणारी कसरत आणि आमदार खासदार यांना मिळणाऱ्या सवलती असोत कि एशोरामाचे जीवन यामध्ये खूपच मोठी दरी निर्माण होत चालेली आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.

महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळा ऋतू सुरु असला तरी काही भागात अजून पूर्णपणे पेरण्या झाल्या नसल्याने शेतकऱ्यांचा घसा कोरडा पडला आहे मात्र राजकारण्यांचे एकीकडे एकमेकांवर राजकीय चिखलफेक जोरात सुरु आहे.

पुढील लेख पण वाचा शेतकऱ्याने गरिबीतच नाही मारायचं

राज्यात अनेक प्रश्न आमदार मात्र बेफिकीर.

एकीकडे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले असताना हे आमदार अगदी चैनीत हॉटेलमध्ये पडलेले दिसत आहेत.

एवढे मात्र नक्की कि काय झाडी काय डोंगर या वाक्यातून आमदार किती चैनेत जीवन जगत आहेत हेच सिद्ध होत आहे. कुठेतरी हे लवकर थांबायला हवे जेणे करून इतर प्रश्न सोडविण्यास यांना जास्त वेल मिळू शकेल.  शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरत लवकर सुटले तरच सगळे ओक्के हाय असे म्हणता येईल.

सध्या काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar  या अफलातून वाक्यावर तर काही गाणी देखील समाजमाध्यमांवर फिरत आहेत. काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar  यावर कविता देखील आली आहे ती खालीलप्रमाणे आहे

काय झाडी काय डोंगर.

हॉटेलहि राहावया मनोहर.

वाटे ओके इथे दिवसभर.

कशास करू मी मरमर.

काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar  या फोन कॉल रेकॉर्डिंग मधून एवढे तरी सिद्ध झाले आहेत कि जे बंडखोर आमदार आहेत त्यांना अत्यंत चैनीमध्ये हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या मानसिक आरोग्याची देखील खूप मोठी काळजी घेण्यात आलेली आहे.

आमदारांची कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *