जिल्हा परिषद निवडणूक  प्रारूप मतदार याद्या या दिवशी येणार

जिल्हा परिषद निवडणूक प्रारूप मतदार याद्या या दिवशी येणार

जिल्हा परिषद निवडणूक 2022 संदर्भातील प्रारूप मतदार याद्या कधी येणार या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व त्या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्द करण्यात येणार आहे.

या मतदार याद्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय यानुसार प्रसिद्द करण्यात येणार आहेत. १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्द होणार्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय यानुसार याद्या संदर्भात काही अक्षेप असतील तर त्यावर हरकत नोंदविता येणार आहे.

ज्या दिवशी जिल्हा परिषद निवडणूकीच्या याद्या प्रसिद्द झाल्या त्या दिवसापासून २२ जुलै २०२२ पर्यंत नागरिकांना त्यांच्या हरकती व सूचना सादर करता येणार आहेत.

२९ जुलै २०२२ रोजी अंतिम अधिकृत मतदार यादी प्रसिद्द करण्यात येईल. 8 ऑगस्ट २०२२ रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्द करण्यात येणार आहेत.

पुढील लेख पण वाचा शबरी घरकुल योजनेचा निधी आला.

जिल्हा परिषद निवडणूक 2022 यादी

खालील यादीमध्ये ज्या जिल्हा परिषदेचे नावे दिलेली आहेत त्या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे.

  • औरंगाबाद.
  • जालना.
  • परभणी.
  • हिंगोली.
  • रायगड.
  • रत्नागिरी.
  • सिंधुदुर्ग.
  • नाशिक.
  • जळगाव.
  • अहमदनगर.
  • पुणे.
  • सातारा.
  • सांगली.
  • सोलापूर.
  • कोल्हापूर.
  • बीड.
  • नांदेड.
  • उस्मानाबाद.
  • लातूर.
  • अमरावती.
  • बुलढाणा.
  • यवतमाळ.
  • वर्धा.
  • चंद्रपूर.
  • गडचिरोली.

जिल्हा परिषद मतदार यादी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महासंवाद वेबसाईट लिंक

निवडणूक प्रक्रियेस वेग

जिल्हा परिषद निवडणूक 2022 संदर्भात अनेकांना उत्सुकता लागलेली होती. आता लवकरच निवडणूक प्रक्रियेस वेग येणार आहे. निवडणुका म्हटल्या कि मग राजकीय समीकरणे जुळविण्यात अनेक मात्तबर लागलेले असतात.

एरवी कधीही विचारपूस न करणारे नेते थेट मतदारांचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसतात. अर्थात हे सर्व निवडणुकी पुरते असते. ज्या उमेदवारांना जनता निवडणू देते त्यांना खरेतर संधीच असते आपल्या क्षेत्रामध्ये विकास कार्य करण्याची आणि याच विकास कार्याच्या आधारे नागरिकांवर छाप पाडण्याची.

जिल्हा परिषद निवडणूक 2022

निवडणुका झाल्या कि राजकारणी सर्व मिळू मिसळून असतात. कार्यकर्ते मत्र एकमेकांचे वैरी झालेले असतात. राजकारण हे केवळ मर्यादित काळापुरते ठेवणे गरजेचे असते. निवडणुका संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील आपापसातील वैर भावना सोडून एकत्रित गावाचा किंवा गटाचा विकास करणे गरजेचे असते.

त्यामुळे कोणतीही निवडणूक असोत ती अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात होणे गरजेचे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *