ई पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. सध्या शेतकरी बांधवांसाठी काहीसा डोकेदुखी ठरू पाहणारा प्रश्न म्हणजे इ पिक पाहणी होय.
अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी केल्याशिवाय पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही का असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता.
परंतु आता या संदर्भातील अधिकृत माहिती आलेली आहे. इ पिक पाहणी करणे सक्तीची नाही अशी सूचना शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
पुढील लेख पण पहा ३.१.५ ॲप्लिकेशन वापरून अशी करा ई पीक पाहणी नोंद
ई पीक पाहणी नोंद सक्तीची नाही शासनाची माहिती.
बऱ्याच शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. परंतु यासाठी अगोदर त्याच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी करून मगच अर्ज करावा का असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता. परंतु आता ई पीक पाहणी सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभाग होण्यासाठी आता ई-पीक पाहणी सक्तीची नसल्याची बाब समोर आलेली आहे.
या संदर्भातील संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अधिकृत माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लगेच पिक विमा अर्ज सादर करून द्या.
शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्यता देण्यात येते. त्यामुळे बरेच शेतकरी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करत असतात.
परंतु पीक पाहणी नोंद केल्याशिवाय पिक विमा भरू नये असा काहीसा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता तो आता दूर झालेला आहे.
आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी सक्तीचे नसल्याने लगेच त्यांनी त्यांचा २०२२-२३ साठीचा ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करून द्यावा.
२०२२ मध्ये पिक विमा योजना मध्येयोजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस ३१ जुलै २०२२ आहे. खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज ऑनलाईन कसा सादर केला जातो या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सक्तीची जरी नसली तरी ई पीक पाहणी नोंद करणे गरजेचे.
शेतकरी बंधुंनो सध्या पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जरी पीक पाहणी करणे गरजेचे नाही. तरी देखील भविष्यामध्ये पिक विमा मिळविण्यासाठी कोणतही अडचण येवू नये यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची पीक पाहणी नोंद करणे गरजेचे असणार आहे.
त्यामुळे सध्या तरी पीक पाहणी करणे गरजेचे नसले तरी भविष्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे.
बऱ्याच घटना अशा आहेत कि अमुक एका शेतकऱ्याला कांदा चाळ योजना लागली परंतु त्यांच्या सातबाऱ्यावर कांदा या पिकांची नोंद नसल्यामुळे त्यांना कांदाचाळ योजनेचा लाभ घेता आला नाही.
तुम्हाला देखील अशी समस्या येवू नये त्यामुळे तुमच्या शेतातील पिकांची नोंद अवश्य करून घ्या. १ ऑगस्ट २०२२ नंतर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.