याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई

याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई

खुशखबर याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई. महाराष्ट्र राज्यामध्ये जून २०२० मध्ये झालेल्या नुकसानीचा जी आर आलेला आहे. अनुदानाची हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे.

३३६४.०६ लाख रुपये म्हणजेच तेहतीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार रुपये एवढा निधी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे.

10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई मिळणार

हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातील यादी देखील दिनांक १५ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेल्या जी आर सोबत दिलेली आहे.

शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे दिली जाणार मदत.

महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०२० या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे अशाच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके या करिता 10 हजार रुपये प्रती हेक्टर एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपये प्रती हेक्टर मदत दिली जाणार आहे. हि मदत जी दिली जाणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

यादी पहा

खालील जिल्ह्यातील जिल्हातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत.

  • अमरावती.
  • बुलढाणा.
  • नाशिक.
  • जळगाव.
  • अहमदनगर.
  • सातारा.
  • सांगली.
  • सोलापूर.
  • कोल्हापूर.
याच शेतकऱ्यांना मिळेल 10
याच शेतकऱ्यांना मिळेल 10

शासन निर्णय GR पहा

कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि नुकसानभरपाईचा निधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विविध पिकांची मोठ्या कष्टाने लागवड करत असतात. परंतु नैसर्गिक अप्पातीमुळे हातात आलेले पिक नष्ट होते. अशावेळी शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पिकांचा पिक विमा काढला तर नक्कीच त्यांना नुकसान भरपाई मिळते.

त्यामुळे शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून द्यावा. खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

ऑनलाईन पिक विमा कसा सादर केला जातो हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खरीप पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *