जाणून घेवूयात लोकमान्य टिळक माहिती मराठी भाषेमध्ये. बालगंगाधर टिळक म्हणजेच आपले स्थोर भारतीय नेते लोकमान्य टिळक. यांची 23 जुलै २०२२ रोजी 166 वी जयंती आहे.
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध धिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असे ब्रीदवाक्य त्यांचे होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केले.
त्यांच्या संघर्षमुळे देशाला स्वातंत्र मिळण्यांस खूप मोठे योगदान मिळाले. देशाच्या स्वातंत्रसाठी लोकमान्य टिळकांनी खूप वर्ष तुरुंगवास भोगला.
ते सुमाजसुधारक, शिक्षक आणि वकील सुद्धा होते. लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त जाणून घेवूयात त्यांच्याविषयी माहिती.
लोकमान्य टिळकांच नाव केशव गंगाधर टिळक, परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी चिखली जि. रत्नागिरी येथे ब्राम्हण कुटुंबात झाला व मृत्यू १ ऑगस्ट १९२० मुंबई येथे झाला.
लोकमान्य टिळक माहिती मराठी भाषेमधून
त्यांच्या वडीलांचे नाव गंगाधरपंत रामचंद्रपंत टिळक. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधरपंत टिळक.
त्यांचे वडील गंगाधरपंत संस्कृतचे शिक्षक होते. बाळ गंगाधर टिळकांच प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी मराठी मीडियम मधून झाळे.
टिळकांनी संस्कृतच शिक्षण घरातच केल. १८६६ मध्ये गंगाधरपंताची बदली पुणे येथे झाली त्यामुळे लोकमान्य टिळक पूर्ण परिवारा सोबत पुण्याला गेले आणि पुढील शिक्षण पुण्यातच पूर्ण केले.
पुण्यात आल्यावर थोड्याच दिवसामध्ये म्हणजेच लोकमान्य टिळक १० वर्षाचे होते तेंव्हा त्यांची आई पार्वतीबाई मरण पावली.
नंतर गंगाधरपंताची बदली ठाण्यात झाली पण लोकमान्य टिळकांनी त्यांच मॅट्रिकच शिक्षण पुण्यामध्येच केले.
लोकमान्य टिळकांचा विवाह १८७१ मध्ये कोकणातील तापीबाई यांच्यासोबत झाला. तापीबाई यांचे टिळक घराण्यातील नाव सत्यभामाबाई आहे.
लोकमान्य टिळक १६ वर्षाचे असतांना त्यांचे वडील गंगाधरपंत यांचे निधन झाले. १८७२ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून त्यांनी बी. ए. डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे १८७९ मध्ये गव्हर्नमेंट लॉं कॉलेज मुंबई मधून एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झ्याल्यावर बाळ गंगाधर टिळकांनी गणित आणि संस्कृत या विषयांची पुणे येथे शिकवणी सुरू केली.
थोर नेते लोकमान्य टिळक माहिती मराठी.
प्रायवेट शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांनी देशात होणाऱ्या चलवळीकडे लक्ष देणे सुरू केले.
जसे कि ब्रिटिशांची शिक्षण पद्धती बरोबर आहे कि नाही. त्यामुळे लोकांच फायदा होतो आहे कि नाही.
सरकारच काम व्यवस्तीत होतोय कि नाही. या दरम्यान त्यांचे शाळेच्या मालकासोबत मतभेद झाले आणि टिळकांनी शाळा सोडून दिली.
शाळा सोडल्यानंतर लोकमान्य टिळकांनी १८८० मध्ये त्यांचे काही कॉलेज मधल्या मित्रासोबत जसे कि गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांचा सोबत ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली.
त्यांचे मुख्य उद्देश भारतीय लोकांना इंग्लिश आणि बाकीच चांगल शिक्षण मिळावे. पुढे चालून १८८४ मध्ये त्यांनी डेक्कन एज्यूकेशनची स्थापना केली आणि १८८५ मध्ये फॉर्गुसन कॉलेजची स्थापना केली.
त्यांचा अशा कार्यामुळे आपण लोकमान्य टिळकांची जयंती उत्साहात साजरी करतो.
लोकमान्य टिळक हे महात्मा गांधी अगोदर खूप मोठे लीडर होते. स्वातंत्रासाठी ते खूप धडपड करत होते. लोकांना एकजूट करून स्वातंत्र्यासाठी तयार करत होते.
आखाडा घेत होते. त्यांनी लाठी क्लब देखील सुरू केले होते. पण त्यांचा आवाज, त्यांचे विचार सर्व देशवासीयापर्यंत कसे पोहचावे असा त्यांच्या समोर प्रश्न होता.
केसरी आणि मराठा केसरी
१८८१ मध्ये त्यांनी दोन वर्तमानपत्र सुरू करायचे ठरवले. ते वर्तमानपत्र म्हणजे ‘केसरी आणि मराठा’ केसरी हे मराठीत होत आणि मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होत.
त्या वर्तमान पत्रातून त्यांचे विचार सर्व लोकांपर्यंत पोहचू लागले. लोक स्वातंत्र्यासाठी टिळकांसोबत जोडू लागलेत.
१८९० साली टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला. यामागील कारण म्हणजे काही सदस्याकडून पैश्याची हेरागिरी, व्यवस्थित सोसायटीला न चालवणे हे होय.
गणपती उत्सवास सुरुवात
लोकमान्य टिळकांनी नॅशनल कॉंग्रेस पार्टी जॉइन केली. भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरे कसे करता येईल याकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणजे १८९३ मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव आणि १८९६ मध्ये सार्वजनिक शिव जयंती उत्सव होय.
त्याअगोदर लोक घरातच हे उत्सव साजरा करत होते. शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे मोगलाई विरुद्ध लढा दिला त्याचप्रमाणे आपण सुद्धा ब्रिटीश हुकुमशाही विरोधात लढा देऊ असा त्यांचा मुख्य उद्देश होता.
भारतात १८९६ साली भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळ संदर्भात लोकमान्य टिळकांनी त्यांच्या वर्तमान पत्रात लिहिले होते कि पीक कमी असेल तर सारामाफी हा शेतकऱ्यांचा आधिकार आहे, हक्क आहे आणि हा अधिकार त्यांना मिळायलाच हवा.
दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे शेतसारा माफ करण्याची विनंती केली होती. दुष्काळ संपताच पुणे, मुंबईसह संपूर्ण देशात प्लेगच्या आजाराने थैमान घातले. लोकमान्य टिळक माहिती मराठी.
तुम्हाला माहिती असावी हि लोकमान्य टिळक माहिती मराठी भाषेतून
टिळकांनी आपतग्रस्त लोकांसाठी स्वस्त ध्यान दुकाने काडली. त्यावेळी प्लेगप्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्या अधिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता.
प्लेग रोखण्यासाठी अधिकारी कोणाच्या पण घरात जावू शकतात आणि सामानाची चौकशी करू शकतात असा आदेश त्यांना अधिकाऱ्यांना देण्यात आलेला होता.
त्यां विरोधात टिळकांनी भरपूर काही लिहिले, दुसऱ्याच्या घरात घुसणे म्हणजे लोकांची अब्रू गेल्यासारखीच आहे. भारतीय लोकांची काहीच किंमत होत नाही असे त्यांचे मत होते.
चाफेकर बंधु लोकमान्यांच्या मार्गावर चालणाऱ्यापैकी होते. त्यानंतर सरकारने बाळ गंगाधर टिळकांना देशद्रोही मनत त्यांना १८ महिने तुरुंगात टाकले.
१८ महिन्यानंतर जेंव्हा टिळकांची सुटका करण्यात आली तेंव्हा लोकानी त्यांना लोकमान्य हा बहुमान दिला आणि ते लोकमान्य टिळक झाले.
बाहेर आल्यावर लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ बद्दल लिहिणे सुरू केले. लोकमान्य टिळक यांच्या सोबत एक व्यक्ति होते ज्यांचे नाव होते जोशेफ. जोसेफ यांनी ‘स्वराज हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हटले होते. टिळकांनी त्या नाऱ्याला पुढे नेले. अजून पुढे वाचा लोकमान्य टिळक माहिती मराठी.
कॉंग्रेस पार्टी सोबत मतभेद
१९०५ मध्ये लॉर्ड कर्झंन यांनी बंगालची फाळणी केली. त्यावेळी टिळकांनी विरोध या फाळणीस विरोध दर्शविला होता.
१९०७ मध्ये कॉंग्रेस पार्टी सोबत त्यांचे मतभेद होवु लागले. पार्टी दोन पक्षामध्ये मध्ये विभाजित झाली. लोकमान्य टिळकांसोबत होते लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, त्यांना पुढे लाल-बाल-पाल असे संबोधल्या जावू लागले होते.
पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर ब्रिटीश सरकारने याचा फायदा घेतला आणि १९०८ पुन्हा त्यांना देशद्रोहीच्या आरोपाखाली अटक केली.
पुन्हा एकदा टिळकांना कोर्टाने ६ वर्ष तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली व म्यानमार येथील तुरुंगात रवानगी केली.
लोकमान्य टिळकांना लिहिण्याची आवड होती त्यामुळे अगदी तुरुंगात देखील त्यांनी लिहिणे सोडले नाही.
पत्नीचे निधन
लोकमान्य टिळक तुरुंगात असतांना १९१२ मध्ये त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे निधन झाले. सहा वर्षांच्या कारावासानंतर १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले.
शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती खालावत चालवली होती तरी त्यांनी चळवळ सुरू ठेवली आणि १९१६ मध्ये होम रुल लीगची स्थापना केली.
होम रुल लीगद्वारे स्वराज्य बद्दल लोकांना सांगायला सुरुवात केली. त्याच वर्षी लखनौ येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे वेळी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि स्वराजाची मागणी चा ठराव एकमताने पास केला.
इंग्लंडमध्ये होम रुलची स्थापना
लोकमान्य टिळकांनी १९१८ मध्ये इंग्लंडमध्ये होम रुलची स्थापना केली. १९१९ मध्ये लोकमान्य टिळक केस संदर्भात इंग्लंड मध्ये गेले होते पण ते केस हरले होते.
इंग्लंड मधील केस प्रकरणामध्ये त्यांना बराच खर्च आला. तेंव्हा लोकानी त्यांना फंड देणे सुरू केले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष करत असतांना १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथे लोकमान्य टिळक यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्यानंतर त्याचं स्वराज्याचं स्वप्न महात्मा गांधीजींनी पुढ नेले. अशा प्रकारे लोकमान्य टिळक माहिती मराठी मधून आपण या ठिकाणी जाणून घेतली आहे.