जाणून घेवूयात वैयक्तिक शेततळे योजना योजना संदर्भात माहिती. जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये वैयक्तिक शेततळे करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण आता मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्यात आला असून यासठी निधी देखील वितरीत करण्यात आलेला आहे.
या संदर्भातील शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध व्हाव्ही यासाठी शेतामधील शेततळे निर्मिती, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनेसाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत हा निधी वितरीत केला जाणार आहे. या आगोदर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना हे अनुदान ४५ टक्के एवढे देण्यात येत होते. यासाठी ५ हेक्टर क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यात आली होती.
या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भू धारक शेतकऱ्यांना २५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के अनुदान देण्यात येते. एकूण गोळाबेरीज केली तर हे अनुदान ८० व ७५ टक्के एवढे होते.
मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेतून राबविली जाणार वैयक्तिक शेततळे योजना
शेतीमध्ये जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास त्यासाठी पाणी असणे खूपच गरजेचे आहे. शेतीसाठी पाणी उपलब्धतेसाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर किंवा बोअर घेत असतात.
परंतु या बोअरला किंवा विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही अशावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी बांधव आता वैयक्तिक शेततळ्याकडे वाळलेले आहेत.
शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साठवणूक केली जाते आणि गरजेचे वेळी ते पिकला दिले जाते. त्यामुळे योग्य वेळी पिकांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते.
वैयक्तिक शेततळे योजना संदर्भात महाडीबीटीवर करता येईल अर्ज.
महाडीबीटी हा शब्द आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या परिचयाचा झाला असेल कारण कि बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लगतो.
शेततळे योजनेसाठी देखील आता तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता आणि मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ घेवू शकता.
महाडीबीटी पोर्टलवर शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आम्ही आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर याधीच बऱ्याच माहितीचे व्हिडीओ प्रकाशित केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडीओज बघून त्या प्रकारे कृती करू शकता.
तरी देखील वैयक्तिक शेततळे योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पुढील लेख पण वाचा.SBI crop loan नूतनीकरण अर्ज सुरु ५० हजार रु. मर्यादेत कर्ज मिळणार.
असा करा शेततळे योजनेसाठी अर्ज.
- mahadbt वेबसाईट ओपन करा.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये वैयक्तिक शेततळे असा पर्याय निवडून अर्ज सादर करा.
वैयक्तिक शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. यामध्ये अगदी तपशीलवारपणे माहिती देण्यात आलेली आहे.
हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.