जाणून घेवूयात श्रावण सोमवार 2022 मराठी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत. आषाढ महिनीच्या नंतर पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमापासून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार पंजाब अशा अनेक राज्यामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होते.
महाराष्ट्रामध्ये हि सुरुवात उशिरा शुक्रवार २९ जुलै रोजी सुरु होते. शुक्रवार पासून महाराष्ट्र श्रावण मासारंभ सुरुवात होणार आहे.
असे म्हणतात कि सौर वर्ष आणि अवनी म्हणूनही हा महिना ओळखला जातो. तमिळ धर्मग्रंथ वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेंव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेंव्हा श्रावण मसाला सुरवात होते.
यालाच श्रावण मास असे म्हणतात. या महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला देव देवता आकाशाच्या खाली येतात येलाच श्रावण नक्षत्राचे सार्वभौमत्व असे म्हणतात.
श्रावण सोमवार 2022 मराठी माहिती
शंकर देवासाठी श्रवण महिना हा अत्यंत प्रिय होता. तसेच शिवभाक्तासाठी हा महिना विशेष आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे.
तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व आतिशय वेगवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजे ते श्रावण सोमवार होय.
या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी श्री शंकर भगवानाची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबदल अशी मान्यता आहे कि हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.
हे पण वाचा लोकमान्य टिळक माहिती मराठी
श्रावण सोमवार 2022 वर्षी श्रावण महिन्यात ४ श्रावण सोमवार
श्रावण महिन्यातील सोमवारला केलेले व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. या वर्षी श्रावण महिन्यात ४ श्रावण सोमवार आहेत.
पुढील प्रमाणे
- २९ जुलै रोजी श्रावण मासारंभ होत आहे.
- पहिला श्रावण सोमवर हा १ ऑगस्ट रोजी आहे.
- त्यानंतर ०८ ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आहे.
- १५ ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार.
- चौथा श्रावणी सोमवार हा २२ ऑगस्टला आहे.
अशाप्रकारे या वर्षी ४ श्रावणी सोमवार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामुठी अर्पण करतात या शिवामुठीचे महत्व वेगवेगळे आहे.
श्रावण सोमवारचे महत्व.
पहिल्या सोमवारी तांदूळ तर दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी जवस आणि पाचवा आणि शेवटचा सोमवार असल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
काही काही वर्षी श्रावण सोमवार हे पाच असते मात्र या वर्षी चार श्रावण सोमवार आहे शनिवारी २७ ऑगस्टला श्रावण अमावास्या असून श्रावण महिना समाप्त होतो.
शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते. पूजा करून महामृत्यंजय मंत्र, शिव पुराणाचे पाठ, रुद्राभिषेक केलाने कर्ज, आरोग्य दोष आणि इतर अडचणी पासून मुक्ती मिळते.
तसेच आपल्या घर मध्ये सुख शांती मिळते. श्रावणातील मंगळवार म्हणजे पहिल्या सोमवर नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळगौरीचे देखील सुधा एक वेगळेच महत्व आहे.
या श्रावणाच्या पहिल्या सोमवार नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्टला मंगळवारी नागपंचमी असते. नाग हा भगवान शंकराच्या गळ्यातील हार आहे.
अनेक पवित्र कारणामुळे नागाची देवता म्हणून सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी शंकराचे आणि नागाचे एक विशेष नाते आहे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दुध गंगाजल बेलपत्र काळे तीळ, धोत्रा, अर्पण करून विधिवत पूजा केली जाते.
श्रावण सोमवार निमित्त अशी करावी पूजा.
- श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करावी.
- स्वच्छ कपडे घालून त्यानंतर मंदिरात शंकरासमोर जाऊन तुपाच दिवा लावावा.
- सर्व देवांच्या मूर्तींना जलाभिषेक करून शिवलिंगाला दुध दह्याने आणि गंगाजलाने स्नान घालावे.
- भगवान शंकराला फळे पुले अर्पण करावीत.
- याशिवाय शंकर भगवानाला बेलाचे पाने अर्पण करवती.
- श्री गणेशाला वंदन घालून श्री शंकराची पूजा अर्चना करावी.
श्रावण सोमवारचे महत्व.
भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे ताप केले होते. असे सांगितले जाते कि श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपुजनात जलाभिषेक रुद्रभिषेकाला विशेष महत्व असते.
श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने शिवाला केवळ एक बेलाचे पान जरी अर्पण केले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते आसे सांगितले जाते.
या महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करणे सुद्धा लाभदायक ठरू शकते.
श्रावण सोमवार व्रत कथा
देवी सतीने तिचे पिता दक्षता घरी शरीराचा त्याग केला होता. त्या आधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळण्यासाठी प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसर्या जन्मात पार्वती आसे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मेन यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला.
पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला.
श्रावण सोमवारच्या महादेवाचे व्रत करून प्रसन्न केल्याची अनेक कथा आपण वाचल्या असतील म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूर्ण दिवस भर उपवास करावा असे सांगितले जाते. आणि तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा.
मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवास ठेवू नये किंवा त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिव शंकराचे मनोभावे ध्यान करावे.
तर अशा पद्धतीने श्रावण मासारंभ निमित्त आपण श्रावण सोमवार निमित्त माहिती जाणून घेतली आहे.