नागपंचमी माहिती मराठी nag panchami mahiti marathi

नागपंचमी माहिती मराठी nag panchami mahiti marathi

जाणून घेवूयात नागपंचमी माहिती मराठी, हिंदू संस्कृतीमध्ये पक्षी, प्राणी, व्रक्ष व वनस्पती सर्वांना विशेष मान दिले जातो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.

नागदेवता शेताच रक्षण करतात म्हणून जीव-जंतु शेताचे नुकसान करत नाही. नागपंचमी सन कधीपासून साजरा करतात, का साजरा करतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्वाचा सन आहे. आपल्या देशात सर्व सन उत्साहाने साजरे केले जातात. नागपंचमी हा सन आनंदाने साजरी केली जातो. नागपंचमी साजरी करण्यामागे वेग वेगळ्या कथा आहेत.

कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व विजय मिळवून ते डोहातून वर आले आणि याच दिवसापासून नागाची पूजा करने सुरू झाली. 

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

नागपंचमी माहिती मराठी माहिती

दुसरी एक कथा म्हणजे सत्येश्वर आणि सत्येश्वरी देवीची कथा. सत्येश्वरी देवीचा भाऊ सत्येश्वर हा नागपंचमीच्या एक दिवस अगोदर मरण पावला.

सत्येश्वरी देवीने तिच्या भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही.  दुसऱ्या दिवशी सत्येश्वरी देवीला त्याचा भाऊ नागाच्या रूपात दिसला. तेव्हापासून नागाला भाऊ  मानण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटले जाते आणि नागपंचमी सन साजरा करणे सुरू झाल.

त्या दिवशी स्त्रिया व मुली संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची व मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी शेतात कोणी काम करत नाहीत. कोणी स्वयंपाक करत नाहीत.

स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोक्याचा आनंद घेतात.

पुढील सणाची पण माहिती घ्या बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करा अगदी मोफत तुमच्या मोबाईलमध्ये.

आजच्या दिवशी नागपंचमी माहिती मराठी माहिती

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया घराची स्वच्छता करतात. घर शेणाने सारवून घेतले जाते. घरासमोर रांगोळी काडतात. नवीन अलंकार घालून नागदेवताची पूजा केली जाते. दूर्वा देखील अर्पण केल्या जातात.

वारुळाची पूजा केली जाते. दूध पाजवतात. नैवेद्य दाखवतात. स्त्रिया उपवास करतात आणि भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

काही लोक नागपंचमीच्या दिवशी गरीब लोकांना अन्न, दूध, खीर दान करतात. ब्राह्मण लोकांना भेटवस्तू देतात. भगवान विष्णु, भगवान शिव आणि नागदेव यांचे मंदिरे नागपंचमीच्या दिवशी भरलेले असतात.

काही लोक घरोघरी जावून भिक्षा मांगतात व नागांना सादर करतात. असे म्हणतात कि सापाची स्मरणसक्ती अतिशय तीक्ष्ण असते.

जे लोक सापाची पूजा  करतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला साप कधीच चावत नाही असी समज आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सापाची पूजा केली जाते.

नागपंचमी माहिती मराठी माहिती

नागाबद्दल बोलायचे म्हणजे नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. साप हा सर्पटणारा प्राणी आहे. लांब दोरी सारखे त्याचे शरीर असते. सापाला पाय नसतात, खालच्या भागावर तो सर्पटत पुढे जात असतो.

सापाला कान नसतात त्याएवजी एक हाड असते जे ध्वनि यंत्रच काम करतात. ते हाड अति संवेदनशील असत. हवेतून जेंव्हा आवाज येतो तेंव्हा त्या हाडाद्वारे डोक्यात जातो आणि सापाला आवाज कळतो.

सर्व सापाला डोळे पण नसतात त्याला डोळे दिसतात पण त्यातून तो पाहू शकत नाही. सापाचे मुख्य दोन प्रकार असतात एक विषारी एक बिनविषारी.

सापाला वरच्या आणि खालच्या जबड्यामुळे मोठ तोंड उगडता येतो.सापाला ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा.

नागपंचमीचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण

सापाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते.

फणाच्या मागच्या बाजूला विविध खूणा असतात. सापामध्ये अनेक रंग आढळतात. काळा आणि तपकिरी रंगाचे नाग जास्त आढळतात. नागाचे खाद्य म्हणजे उंदीर तर आहेच पण बेडूक सुद्धा नागाचा खाद्य आहे.

नागाचा शत्रू म्हणजे गरुड, मुंगूस आणि मानव पण नागाचा शत्रू आहे कारण नाग चावेल या भीतीने माणुस सापाला मारतो. 

नागाच्या उपजाती

किंग कोब्रा (नागराज) : हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मीळ साप आहे. हा लांबीला सर्वात जास्त लांब आहे आणि याचे विष सर्वात जास्त घातक असते.

या सापाची लांबी पाच मिटरच्या आसपास असु शकते. दिसायला रुबाबदार असून याचा फना इतर नागापेक्षा लहान असतो.

याचे जीवन दुर्मिळ असते आणि हा घणाट जंगलात राहणे पसंद करतो. 

काळा नाग: ही जात प्रामुखणे पाकिस्तान आणि राजस्थानमध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते आणि याची लांबी दुसऱ्यापेक्षा कमी असते, याचा फना देखील लहान असत. 

हिरवा नाग : हा नाग हिरव्या रंगाचा असतो आणि पाण्याच्या ठिकाणे बाम्बू वर जास्त आढळतो. हा नाग जास्त करून दक्षिण भारतात आढळतो. असे अजून भरपूर नागाचे प्रकार आहेत.

भारतीय संस्कृतीत नागाला आदराचे स्थान आहे पण भीतीपोटी माणुस स्वतःला वाचवण्यासाठी नागावर हल्ला करतो.

नागपंचमीच्या दिवशी नागाची आदराने पूजा केली जाते. नागपंचमी हा सन उत्साहाने साजरा करतात.

सर्व शेतकरी बांधवाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *