फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलण्याची घोषणा. महाराष्ट्रामध्ये नुकताच मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी मिळाली. हे पद मिळताच त्यांनी सर्वप्रथम हॅलो एवजी वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश काढण्याची घोषणा केली आहे.
फोनवर हॅलो एवजी वंदे मातरम् म्हण्याची घोषणा करण्यात आली असून लवकरच या शासन निर्णय काढण्यात येणार असूल अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.
या संदर्भातील माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिलेली आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या संदर्भातील सविस्तर माहिती बघू शकता. येथे क्लिक करा
हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलण्याची चांगली घोषणा
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारीच नव्हे तर जवळपास सर्वच नागरिक फोनवर बोलतांना हॅलो हा शब्द वापरतात. हॅलो हा शब्द इंग्रजी आहे. यामुळे फोनवर बोलताना हॅलो म्हणणे एक प्रकारे पश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे होय.
भारताची संस्कृती महान आहे. पश्चात्य राष्ट्र देखील भारताच्या संस्कृतीचे गुणगान करतात. अशावेळी फोनवर हॅलो एवजी वंदे मातरम् म्हणण्याचा हा निर्णय नक्कीच अभिमानास्पद आहे यात तीळमात्र शंका नाही.
हॅलो एवजी वंदे मातरम् म्हटल्यामुळे नक्कीच देशभावना जागृत होईल. सध्या हा आदेश सर्व शासकीय कर्मचारी वर्गांसाठी जरी आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी देखील फोनवर बोलताना हॅलो एवजी वंदे मातरम् म्हटल्यास नक्कीच समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामन्यांनी फोनवर काय बोलावे अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलणे भारतीय संस्कृती.
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 मध्ये लिहिलेले आहे. त्यांच्या लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् आहे.
वंदे मातरम् हा नारा देत देत देशासाठी अनेक महात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. त्यामुळे हा निर्णय नक्कीच चांगला आहे असे म्हणता येईल.
सध्या तरी केवळ शासकीय कार्यालयामध्ये फोनवर बोलतांना हॅलो एवजी वंदे मातरम् बोलण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु भविष्यामध्ये इतर नागरिक देखील हॅलो एवजी वंदे मातरम् म्हणतील आणि हि आपल्या देशासाठी नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रमाणे हे अभियान पण यशस्वी व्हावे.
नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यामध्ये अनेकांनी आपल्या सोशल मिडिया प्रोफाईल चित्र म्हणून राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठेवलेला होता.
हर घर तिरंगा हे अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आले. या अभियानास नागरिकांनी उत्त्म्ज प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर या अभियानामध्ये जे सहभागी झाले होते त्यांनी त्यांचे हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाउनलोड देखील केलेले आहे.
ज्या पद्धतीने हर घर तिरंगा अभियान यशस्वी झाले अगदी त्याच पद्धतीने हॅलो च्या ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याची सवय देखील नागरिकांना लागली तर नक्कीच फायदा होईल.