यावर्षी शासन गणेश मंडळ पुरस्कार देणार असल्याने हि मांडले मालामाल होणार आहेत. ५ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे मिळणार आहेत. गणेशोत्सव म्हटला कि आनंदाची पर्वणीच. महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो.
शहरीभागासह ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो.
या वर्षी म्हजेच २०२२ रोजी सुरु होणाऱ्या गणपती उत्सव निमित्त शासनाच्या वतीने गणेश मंडळाना बक्षीस वितरण केले जाणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला घेतलेला आहे.
त्यामुळे तुमच्या गावामध्ये देखील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने गणपती बसविलेला असेल तर त्यांना देखील हे बक्षीस जिंकण्याची नामी संधी मिळणार आहे.
पुढील लेख पण वाचा गणपती बाप्पाची आरती pdf मध्ये डाउनलोड करा.
गणेश मंडळास ५ लाखापासून २५ हजारापर्यंत मिळणार पुरस्कार.
शासनाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये ज्या गणेश मंडळाचा पहिला नंबर येईल त्या गणेश मंडळास ५ लाख रुपये बक्षीस मिळेल.
दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या गणेश मंडळास २.५० लाख रुपये बक्षीस दिले जाईल तर स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या गणेश मंडळास १ लाख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याशिवाय गणेश मंडळांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात देखील येणार आहे.
हे तर झाले राज्यस्तरीय बक्षीस मात्र जिल्हा स्तरीय बक्षीसे देखील गणेशोत्सव मंडळास मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या गणेश मंडळास रुपये २५ हजार एवढे पारितोषिक दिले जाणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि एवढे बक्षिसे दिली जाणार असतील तर त्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा तर नक्कीच मित्रांनो अर्ज करण्यासाठी गणेश मंडळांना www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे.
हि नोंदणी दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. विहित नमुना अर्ज देखील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हा अर्ज डाउनलोड करून यामध्ये व्यवस्थित माहिती भरून घ्या. पूर्ण व्यवस्थित माहिती भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या इमेल आयडीवर मेल करावा लागणार आहे. हा इमेल ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत करणे गरजेचे आहे.
जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड ठरलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन देऊन करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्जामध्ये भरावयाची माहिती.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव अर्जामध्ये व्यवस्थित लिहावे.
- त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची नावे, मोबाईल क्रमांक व ई-मेल व्यवस्थित लिहावे.
- अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांची माहिती पत्रव्यवहारचा पूर्ण पत्ता सविस्तर लिहावा जेणे करून निवड समितीला हा पत्ता शोधण्यास सोपे होईल.
- उत्सव स्थळ व्यवस्थित लिहावे.
- धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केल्याबाबतचा तपशील किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची परवानगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतल्याचा तपशील किंवा त्याची प्रत या अर्जासोबत पाठवावी लागणार आहे.
- स्थापन केली जाणारी गणरायाची मूर्ती पर्यावरण पूरक मूर्ती आहे किंवा नाही असल्यास त्या मूर्तीचा तपशील अर्जामध्ये लिहावा.
- पर्यावरण पूरक सजावट उदाहरणार्थ थर्माकोल, प्लास्टिक इत्यादी साहित्य विरहित आहे किंवा नाही असल्यास तपशील व्यवस्थित लिहावा.
- ज्या ठिकाणी गणराची स्थापना केली जाणार आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण रहित वातावरण आहे किंवा नाही हे देखील या अर्जामध्ये कळवावे लागणार आहे.
- गणेशोत्सव दरम्यान पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा सजावट आहे किंवा नाही असेल तर त्या बाबत माहिती द्यावी कोणती संकल्पना आहे त्याचा तपशील द्यावा
- स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा सजावट आहे किंवा नाही असल्यास तपशील द्यावा.
- रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य गणेशोत्सव दरम्यान आयोजित केलेले आहे किंवा नाही असल्यास त्या संदर्भात तपशील अर्जामध्ये द्यावा.
- गणेशोत्सव दरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य असल्यास त्या संदर्भात अर्जामध्ये तपशील द्यावा.
- महिला ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य असल्यास तपशील द्यावा.
- गणेशोत्सव दरम्यान पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत किंवा नाहीत पारंपारिक देशी खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत किंवा नाहीत असल्यास माहिती लिहावी.
- गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदाहरणार्थ पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूक अडथळा येणार आहे या बाबतीतील नियोजन शिस्त इत्यादी अन्य काही माहिती द्यायची असल्यास ती या अर्जामध्ये लिहायची आहे.
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
गणेश मंडळ पुरस्कार निवड पद्धत.
या स्पर्धेमधील सहभागी महाराष्ट्रातील तमाम गणेश मंडळाची गुणांकन निकषांच्या आधारे बक्षिसांसाठी निवड करण्यात येईल. एकूण गुण १५० असून कोणत्या बाबीसाठी किती गुण असणार आहेत ते खालीलप्रमाणे
अ.क्र | गुनंकानासाठी बाबी | गुणांक |
---|---|---|
१ | पर्यावरण पूरक मूर्ती | १० गुण |
२ | पर्यावरणपूरक सजावट ज्यामध्ये थर्माकोल प्लास्टिक इत्यादी साहित्य नसेल असे | १५ गुण |
३ | ध्वनी प्रदूषण रहित वातावरण | ०५ गुण |
४ | पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा व सजावट केल्यास | २० गुण |
५ | स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा किंवा सजावट | २५ गुण |
६ | रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर इत्यादीसाठी | १० गुण |
७ | शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक/आरोग्य/सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य | १० गुण |
८ | महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/आरोग्य/सामाजिक इत्यादीसाठी केलेले कार्य | १० गुण |
९ | पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा | १० गुण |
१० | पारंपारिक व देशी खेळाच्या स्पर्धा | १० गुण |
११ | गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदाहरणार्थ पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूक अडथळा येणार आहे या बाबतीतील नियोजन आयोजनातील शिस्त इत्यादीसाठी | २५ गुण |
अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा
वरील प्रमाणे जर सर्व निकष गणेश मंडळ पूर्ण करत असेल तर अशा गणेश मंडळांना ५ ते १ लाखापर्यंत पारितोषिके मिळू शकतात. गणेश मंडळ पुरस्कार संदर्भातील माहिती तुमच्या गावामध्ये नक्की शेअर करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
या योजनेसंदर्भातील ऑडीओ माहिती ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अर्ज इमेलने ऑनलाईन करावा लागणार आहे.
http://www.pldeshpandekalaacademy.org/ या वेबसाईटवर अर्ज pdf मध्ये उपलब्ध असून हा अर्ज इमेलने पाठवायचा आहे.
३० ऑगस्ट २०२२ हि गणेश मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.