कापूस बाजार भाव 14 हजारापेक्षा जास्त मिळाला भाव

कापूस बाजार भाव 14 हजारापेक्षा जास्त मिळाला भाव

कापूस बाजार भाव संदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाला १४,७७२ एवढा भाव मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते.

यावर्षी कापसाला प्रचंड मागणी असल्याने कापसाचे दर तेजीत राहणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु ज्या पद्धतीने अंदाज लावण्यात आला होता त्यापेक्षा जास्त बाजारभाव कापसाला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे. कापसाला यावेळी १४,७७२ (चौदा हजार सातशे बहात्तर रुपये ) एवढा भाव मिळाला आहे.

14 हजारापेक्षा जास्त कापूस बाजार भाव

कापसाला मिळणारा हा प्रचंड भाव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कापसाला भारतासह अंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हनून कापसाला प्रचंड भाव मिळत आहे.

सध्या मिळत असलेला भाव लक्षात घेता भविष्यामध्ये यापेक्षा जास्त देखील मिळू शकतो. त्यामुळे जे शेतकरी कापूस उत्पादक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच या बातमीमुले स्मितहास्य निर्माण झाले असेल यात शंका नाही.

अर्थात हा कापूस खरेदीचा शुभारंभ असल्याने एवढा भाव मिळू शकतो. या भावामध्ये भविष्यामध्ये चढ उतार देखील होऊ शकतात. परंतु सध्या मिळणारा भाव लक्षात घेता याहीपेक्षा येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

पुढील लेख पण वाचा कापसाचे दर वाढण्यास सुरुवात निर्यात बंदीचे मनसुबे उधळले तेजी सुरु.

कापसाला मिळतोय उत्तम भाव

कोणतेही पिक घेण्यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये राबराब राबत असतात. कापूस असोत कि इतर पिके त्यावर फवारणी करणे, खते, मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हैराण असतात. एवढे करूनही बळीराजा चांगले उत्पादन घेतो.

अशावेळी जर त्यांच्या शेतातील पिकास चांगला भाव मिळाला तर नक्कीच त्यांच्या मेहनतीचे चीज होते. शेतकरी बांधवाना कोणत्याही सुविधा नाही दिल्या तरी चालेल मात्र त्यांच्या पिकला चांगला भाव मिळाला पाहिजे.जेणे करून शेती करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल.

कापूस पिकाप्रमाणेच इतर पिकांना देखील चांगला भाव मिळेल अशी आशा करूयात जेणे करून शेतकरी बांधवाना दोन अधिकचे पैसे मिळतील.

कोणताही माल योग्य बाजारभाव असेल तरच विक्रीला काढला पाहिजे. माल विकण्याची घाई केली तर कमी भावामध्ये कापूस किंवा इतर पिके शेतकरी बांधवाना विकावी लागतात.

कापूस पिकला मिळत असलेला चांगला भाव लक्षात घेता सुरुवात चांगली झालेली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापसा बरोबरीने इतर पिके देखील जमा होणार आहेत. त्यामुळे इतर पिकांना देखील चांगला भाव मिळेल अशी आशा करूयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *