मोदींचा 12 वा हफ्ता होणार जमा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात

मोदींचा 12 वा हफ्ता होणार जमा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात

मोदींचा 12 वा हफ्ता केंव्हा बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये कमालीची उत्सुकता लागली होती.

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मदत दिली जाते. हि मदत २००० रुपये या प्रमाणे एकूण तीन हफ्त्याम्ध्ये दिली जाते.

किसान सम्मान निधीचा १२ हफ्ता कधी मिळेल याकडे अनेक अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांचे लागलेले लक्ष आता संपणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी pm kisan samman nidhi चा १२ व्या हफ्ता आज म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

पुढील माहिती पण कामाची आहे 50 hajar protsahan yojana या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

२ हजार रुपयांचा मोदींचा 12 वा हफ्ता आज होणार जमा.

या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी व कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. दिवाळी आता जवळ येत आहे. शेतकरी बांधवांच्या शेतातील सोयाबीन व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना दिवाळी साजरी कशी करावी या संदर्भात चिंता लागलेली आहे.

अशामध्ये मोदींचा मिळणारा १२ हफ्ता नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. सध्या शेतामध्ये कोणतेही नगदी पिके नसल्याने शेतकऱ्यांकडे खर्चासाठी आर्थिक तंगी भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे मोदींचा उद्या म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा होणारा पीएम किसान सम्मान निधीचा १२ हफ्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

या योजना संदर्भातील एक व्हिडीओ खास तुच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तो खालील व्हिडीओ देखील पहा.

पीएम किसान सम्मान निधीचा १२ वा हफ्ता अमुक एका तारखेला जमा होणार अशा संदर्भातील विविध बातम्या किंवा माहिती विविध समाज माध्यमांवर येत होती. परंतु आता पीएम किसान सम्मान निधीचा १२ वा हफ्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातील खात्रीशीर माहिती देण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही केंद्रीय कृषी व कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे खालील ट्विट बघू शकता.

तर शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने आता उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सम्मान निधी pm kisan samman nidhi चा १२ वा हफ्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *