शेतीचा भू नक्शा bhu naksha 2024 पहा ऑनलाईन pdf मध्ये करा डाउनलोड

शेतीचा भू नक्शा bhu naksha 2024 पहा ऑनलाईन pdf मध्ये करा डाउनलोड

जाणून घ्या शेतीचा भू नक्शा ऑनलाईन कसा पाहावा किंवा pdf मध्ये डाउनलोड कसा करावा. इंटरनेटमुळे शेती क्षेत्रामध्ये देखील कमालीचा बदल झालेला आहे. शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधावरून वाद सुरु असतात. हेच वाद कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असते.

तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमच्या शेतीचा भू नक्शा bhu naksha अगदी मोबाईलवर online बघू शकता.

शेतीचा भू नक्शा मोबाईलवर कसा बघावा या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्ही देखील तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलवर तुमच्या शेताचा भू नक्शा bhu naksha बघू शकता.

हा भू नक्शा बघणे अत्यंत सोपे आहे त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे तो देखील बघा म्हणजेच तुम्हाला तुमच्या शेतीचा भू नक्शा bhu naksha शोधण्यास अधिक मदत मिळेल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा मोबाईलवर

भू नक्शा ऑनलाईन शोधण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

  • गुगलमध्ये https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp हि वेबसाईट शोधा किंवा येथे क्लिक करा
  • वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रीनच्या डाव्याबाजूला व्यवस्थित माहिती निवडा.
  • State – या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा.
  • Category – या चौकटीत तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे रुरल Rural आणि दुसरा अर्बन urban. तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर Rural हा पर्याय निवडा आणि जर शहरी भागातील असाल तर Urban हा पर्याय निवडा.
  • District – मध्ये जिल्हा निवडा.
  • Taluka – तुमचा तालुका दिलेल्या यादीतून निवडा.
  • Village – तुमचे गाव शोधा.
  • Search by plot no या चौकटीमध्ये  तुमच्या शेताचा गट नंबर टाका.
  • आणि सर्वात भिंगाच्या निशाणीवर क्लिक करून सर्च करा.

मोबाईलवर पहा तुमच्या जमिनीचा नकाशा.

जसे हि तुम्ही सर्च कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमच्या शेत जमिनीचा नकाशा दिसेल. दिलेल्या नकाशामधील गट नंबरमध्ये किती शेतकरी आहेत या संदर्भातील माहिती देखील तुम्हाला अगदी चुटकीसरशी मिळू शकते.

वरील भू नक्शा bhu naksha ऑनलाईन कसा पाहावा या संदर्भातील माहिती कॉम्पुटरचा उपयोग करून सांगितलेली आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर नसेल तरी देखील अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील हा शेतीचा भू नक्शा पाहू शकता.

तर शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने अगदी सोप्या रीतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेत जमिनीचा नकाशा बघू शकता.

हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

तुमच्या मनामध्ये कदाचित खालील काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याची उत्तरे बघा.

शेत जमिनीचा भू नकाशा मोबाईलवर पाहता येतो का?

होय. शेत जमिन नकाशा अगदी मोबाईलवर पण पाहता येते. हा नकाशा कसा बघावा या संदर्भातील व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेला आहे. त्यामुळे अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही जाणून घेवू शकता कि तुमच्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा आहे.

शेत जमीन नकाशा पाहण्यासाठी काही खर्च येतो का?

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेत जमिनीचे कोणतेही कागदपत्रे काढायचे असेल तर त्यासाठी काही शुल्क भरावे लागते. परंतु ऑनलाईन भू नकाशा पाहण्यासाठी कसलेली शुल्क लागत नाहीत.

शेतीचा नकाशा pdf मध्ये डाउनलोड करता येतो का?

ऑनलाईन भू नक्शा pdf मध्ये डाउनलोड देखील करता येतो. याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *