ई डब्ल्यू एस आरक्षण मिळाले लाभ घेण्यासाठी काढा ews certificate

ई डब्ल्यू एस आरक्षण मिळाले लाभ घेण्यासाठी काढा ews certificate

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे ई डब्ल्यू एस आरक्षण ews 10 percent reservation वैद्य ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सगळ्यात अगोदर ई डब्ल्यू एस आरक्षण म्हणजे काय ते समजावून घेवूयात ews reservation full form. EWS चा फुल फॉर्म म्हणजे economically weaker sections होय. म्हणजेच ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण लागू राहणार आहे.

ई डब्ल्यू एस आरक्षणाची तरतूद 103 व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. हे ई डब्ल्यू एस आरक्षण वैद्य असल्याचा निकाल सोमवारी म्हणजेच दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

त्यामुळे दहा टक्के आरक्षणाचा लाभ आता कुठल्याही आरक्षणाचा लाभ न घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार आहे. यामुळे आता मराठा तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्यासाठी फायदा होणार आहे.

पुढील लेखपण वाचा Mahabocw scholarship scheme बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

ई डब्ल्यू एस आरक्षण मिळाले आता लाभ घेणे महत्वाचे

ज्या पद्धतीने ई डब्ल्यू एस आरक्षण वैद्य ठरविण्याचा निर्णय देण्यात आला तसाच न्याय आता मराठा आरक्षणाला मिळावा यासाठी राज्य शासनाने न्यायालयात सक्षम बाजू मांडावी अशा भावना देखील मराठा समाजातून व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ई डब्ल्यू एस आरक्षणाचा ews reservation लाभ मराठा तरुणांना घेता येणार आहे. मराठा आरक्षण अजून प्रलंबित असून जोपर्यंत स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत या ई डब्ल्यू एस आरक्षणाचा मराठा तरुण लाभ घेवू शकतात.

ई डब्ल्यू एस आरक्षणामुळे मिळणार मराठा तरुणांना लाभ.

ई डब्ल्यू एस आरक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी आणि उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा अडथळा दूर झाला आहे त्यामुळे या आरक्षणाचा लाभ नक्कीच या तरुणांना मिळेल यात शंका नाही.

या निर्णयामुळे कोणत्याही आरक्षणाचे लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांना सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक संस्थातील प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ मिळू शकणार आहे.

अनेक दिवसापासून मराठा आरक्षण संदर्भात चर्चा सुरु आहे. असे असतांना सर्वोच्च न्यायालयाने ई डब्ल्यू एस आरक्षण संदर्भात दिलेला हा निर्णय खूपच महत्वाचा आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

आरक्षण निकष terms for ews reservation.

  • वार्षिक ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त शेती नसावी.
  • घराचे जे क्षेत्र असणार आहे ते एक हजार चौरस फूट किंवा त्याहून मोठे नसावे.
  • महानगरपालिका क्षेत्रातील कुटुंबाचे रहिवासी घराचे क्षेत्र 900 चौरस फुटापेक्षा जास्त नसावे.
  • गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी 1800 चौरस फूट जागेची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे.

वरील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस किंवा अर्जदारास आर्थिक दुर्बलासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणजेच ews reservation चा लाभ घेता येईल.

कोठे मिळेल दाखला ews certificate

सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचा प्रश्न म्हणजे ई डब्ल्यू एस दाखला मिळतो कोठे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.

तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जावून तुम्ही ई डब्ल्यू एस दाखला ews certificate मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. तहसील कार्यालयात अर्ज करतांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती कागदपत्रे कोणती या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

ई डब्ल्यू एस दाखला ऑनलाईन देखील काढता येतो. दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त होते.

तर आता जाणून घेवूयात की ews certificate काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात.

पुढील यादी बघितली का ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 आली यादीत पहा तुमचे नाव

प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे.

  • लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.
  • अर्जदार व त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा.
  • रेशन कार्ड.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • आठ लाखाच्या मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला (सातबारा आठ अ फॉर्म 16 आयकर भरल्याचा पुरावा)
  • खाजगी आस्थापना वरील नोकरदाराला कंपनीच्या लेटरहेडवर उत्पन्नाचा दाखला त्याचप्रमाणे बँक स्टेटमेंट जोडणे आवश्यक राहील किंवा आयटीआर देणे आवश्यक असेल.
  • अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचा पुरावा.
  • तीन पासपोर्ट साईज फोटो.
  • ही सर्व कागदपत्रे खरी असल्याचे घोषणापत्र

वरती उल्लेख केल्याप्रमाणे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र म्हणजेच ews certificate काढण्यासाठी आवश्यक असणार आहेत. हि तर झाली कागदपत्रे आता जाणून घेवूयात पुढील प्रक्रिया कशी राहील.

EWS certificate प्रोसेस

  • सेतू कार्यालयामध्ये वीस रुपयांमध्ये अर्ज मिळतो तो अर्ज घ्यावा.
  • तलाठी कार्यालयात जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन साक्षीदारांचे पुरावे, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांची तलाठी कार्यालयात जाऊन पडताळणी करून घ्यावी.
  •  त्यानंतर ही कागदपत्रे सेतू कार्यालयात जमा करावीत. तेथे पावती देण्यात येते त्याकरता पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते.
  • अर्ज करतांना लाभार्थी स्वतः उपस्थित असणे आवश्यक असते कारण अर्जदाराचे त्याची छायाचित्र त्या ठिकाणी स्कॅन केली जाते.
  • यानंतर तहसील कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी होऊन सात दिवसांनी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ews certificate देण्यात येते.

अशा पद्धतीने ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यात येते. कुठल्याही आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांना या ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

खालील बटनांचा उपयोग करून हि माहिती जास्तीत जास्त गरजू तरुणांना पाठवा जेणे करून त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *