शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज परंतु याचा लाभ थोड्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जाऊन घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.
लोडशेडिंगमुळे शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेतातील पिकास पाणी द्यावे लागते. महाराष्ट्रातील तमाम बांधवानी दिवसा लोडशेडींग करू नये यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने तसेच मोर्चे देखील काढलेले आहेत.
याच बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून आता शेतकरी बांधवाना दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे. लोडशेडिंगमुळे शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी पिकास पाणी द्यावे लगते.
लोडशेडींगमुळे रात्रपाळीत पाणी देत असतांना अनेक शेतकरी बांधवासोबत दुर्घटना देखील झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.
तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
त्यामुळे आता यापुढे शेतकरी बांधवाना दिवसा वीज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणारा हा निर्णय अतिशय चांगला आहे.
सध्या फक्त चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
वरील जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन करण्यात येत असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्यप्राण्यांच्या होणा-या हल्ल्यात शेतक-यांचे बळी जाण्याचा घटनांना आळा घालण्यासाठी हा दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसाचे भारनियमन टाळण्याची गरज
केवळ वरील जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यात देखील असाच निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवाना शेतीमध्ये आधीच इतर नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागते. एवढे कष्ट करून देखील हाती पदरी आलेले पिक विजेच्या भारनियमनामुळे वाया जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे ज्या पद्धतीने वरील जिल्ह्यासाठी शेतीसाठी वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे अगदी तसाच पद्धतीने इतर जिल्ह्यांसाठी देखील वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे.
विहिरीमध्ये पाणी उपलब्ध असून देखील केवळ वीज उपलब्ध नसल्याच्या कारणाने अनेक शेतकरी बांधवाना त्याच्या शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे अनेक शेतकरी बांधव सौर ऊर्जेकडे वळतांना दिसत आहे.
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत सौर उर्जेवर आधारती पंप खरेदी करण्यासाठी शासनांकडून अनुदान देण्यात येते. सोलर पंप हा देखील शेतकरी बांधवांकडे उत्तम पर्याय आहे. सोलर पंप लावून देखील शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांना दिवसा पाणी देवू शकतात.
पुढील माहिती पण कामाची आहे नक्की वाचा सौर कृषी पंप कोटा उपलब्ध यादी पहा