सातबऱ्यामध्ये मोठा बदल कोणता फरक पडेल UL PIN मुळे

सातबऱ्यामध्ये मोठा बदल कोणता फरक पडेल UL PIN मुळे

सातबऱ्यामध्ये मोठा बदल झाला असून तो नेमका काय आहे आणि त्यामुळे कोणता फायदा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती बघा.

शेतकरी आणि सातबारा यांचा संबध अगदी घनिष्ट आहे. पूर्वीचा सातबारा हाताने लिहिला जात होता त्यामुळे आपसूकच त्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त होती अर्थात ती संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये देखील असते परंतु चुका होण्याची जास्त शक्यता हस्तलिखित सातबाऱ्यामध्ये जास्त होती.

जसजसे इंटरनेटचे जाळे वाढत गेले तसतशी दैनदिन कामकाम पद्धत देखील बदलत गेली. मग आपल्या शेतकरी बांधवांच्या हस्तलिखित सातबाऱ्याने देखील कात टाकली आणि तो देखील ऑनलाईन झाला. शेतकरी बांधवाना सातबारा ऑनलाईन मिळू लागल्याने शेती संबधित कामे सोपी आणि वेगाने होऊ लागली.

WhatsApp Group
WhatsApp Group

आता याच सातबाऱ्यामध्ये आणखी एक बदल झाला आहे आणि तो म्हणजे सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकावर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच यु एल पिन UL PIN नंबर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. UL PIN ज्याला इंग्रजीमध्ये युनिक लँड पार्सेल आयडेंटीफिकेशन नंबर  असे म्हणतात. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

पुढील लेख पण वाचा ऑनलाईन सातबारा दुरुस्ती जमीन कमी नावात चूक स्वतः दुरुस्त करा.

सातबारा मिळकत पत्रिकावर आता यु एल पिन UL PIN बंधनकारक केंद्र शासनाच्या सूचनेला राज्याची मान्यता

सातबाऱ्यावर यु एल पिन नंबर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिका वर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच यु एल पिन नंबर दिसणार आहे.

सातबारा UL PIN संदर्भातील एक शासन निर्णय 30 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेला आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवाया तयार करणे आणि सुव्यवस्थेत ठेवणे नियम 1971 मधील तरतुदीचा आधार घेवून यापुढे सातबाऱ्यावर UL PIN दर्शविला जाणार आहे.

शेतकरी शेतकरी बांधवाना आता प्रश्न पडला असेल कि या UL PIN मुळे नेमके होणार तरी काय. सातबारा किंवा मिळकत पत्रिकावर जो UL PIN दर्शविला जाणार आहे त्यामुळे केंद्र शासनास कोणत्याही मालमत्तेचा शोध घेणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे.

सातबारा आणि मिळकत पत्रीकावर UL PIN दर्शविण्याच्या सूचना केंद्राने अनेक राज्यांना या अगोदरच केलेल्या आहेत.

पुढील लेख पण वाचा जुना सातबारा जुने फेरफार व जमिनीचे इतर कागदपत्रे डाउनलोड करा.

UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल काय पडेल

महाराष्ट्र राज्यात याआधीपासूनच गावनिहाय्य दस्तऐवज जतन केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गावातील महसुली दप्तरांमध्ये पहिल्या क्रमांकापासून सुरुवात केली जाते.

आता मात्र UL PIN येणार असल्याने देशातील कोणत्याही मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक दर्शविला जाईल व त्याची दस्ताऐवजाची ओळख तात्काळ पटवणे शक्य होईल.

UL PIN मुळे असे होणार सातबारा उताऱ्यावरील बदल

  • गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी आता पिन क्रमांक टाकला जाईल.
  • सातबारा उतारा दस्ताऐवजावर यू एल पीन संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड दिसेल. हा कोड सातबाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात असेल आणि या ठिकाणी एक क्रमांक देखील दिला दिसेल.
  • मिळकत पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.
  • पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला यू एल पिन क्रमांक दिला जाईल.

जसा नागरिकांना आधार क्रमांक दिला जातो आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते अगदी अशाच पद्धतीने हा युएलपिन काम करणार आहे. UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल झाला असून यामुळे दस्ताऐवज मिळविणे खूपच सोपे ह होणार आहे.

थोडक्यात यु एल पिन म्हणजे मालमत्तेचा आधार क्रमांकच आहे. युएल पिनमुळे संपूर्ण माहिती अगदी एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे.

तर शेतकरी बंधुनो अशा पद्धतीने आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेतलेले आहे कि सातबारा कसा बदलणार आहे. युएलपिनमुळे कोणत्या सुविधा मिळणार आहे आणि त्याचे महत्व काय असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *