CCI करणार कापूस खरेदी कापसाचे दर वाढण्याची शक्यता

CCI करणार कापूस खरेदी कापसाचे दर वाढण्याची शक्यता

CCI करणार कापूस खरेदी पहा संपूर्ण माहिती.

सीसीआयने अर्थात भारतीय कापूस महामंडळाने cotton corporation of India बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदीत उडी घेतल्याने आता शेतकऱ्यांच्या कापूस दरवाढीच्या अशा पल्लवित झालेल्या आहे.

सीसीआय बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करणार असल्याने कापूस खरेदीबाबत स्पर्धा निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

सध्या कापसाला कमी अपेक्षेनुसार दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या घरामध्ये, गोडावूनमध्ये कापूस साठवून ठेवलेला आहे. कापसाला किमान १० हजार रुपये दर तरी मिळायला हवा या आशेवर अनेक शेतकरी बांधव आहेत.

एरवी सीसीआय कडून हमीभावाने कापूस खरेदी केली जाते परंतु यावर्षी मात्र सीसीआयने बाजार भावाने कापूस खरेदी करण्याचे जाहीर केले आहे.

पुढील लेख पण वाचा कापसाला प्रचंड भाव मिळण्याची शक्यता यामुळे वाढत आहे भाव.

CCI करणार कापूस खरेदी

कापूस बाजारात सीसीआय सारखा मोठा खरीददार उतरला आहे त्यामुळे कापूस खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होऊ शकते परिणामी बाजार टिकून राहील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कापसाला जास्त भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकरी बांधवानी त्यांचा कापूस विकलेला नाही. कापसाचे भाव आणखी कोसळणार आहे किंवा भाव वाढणार नाही अशा आशयाचे संदेश WhatsApp व इतर समाजमाध्यमांवर येत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. मात्र आता CCI च्या आगमनामुळे अशा शक्यतांना महत्व राहिले नाही.

पुढील महिन्यापासून म्हणजेच जानेवारी २०२३ पासून कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीसीआयने बाजार भाव नुसार कापूस खरेदी सुरू केल्यामुळे कापूस दराला आधार मिळू शकतो. सीसीआयच्या खरेदीमुळे कापसाच्या दराचा नवीन बेजमार्क तयार होईल त्याखाली बाजार जाणार नाही तसेच दरात सुधारणा होण्यास मदत देखील होण्याची शक्यता आहे.

खालील व्हिडीओ पहा.

कोण आहे सीसीआय

CCI म्हणजे cotton corporation of India होय.

31 जुलै 1970 रोजी CCI ची स्थापना कंपनी कायदा 1956 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली झाली आहे.

CCI स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात, कापसाच्या विपणन क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव उपक्रम म्हणून, सीसीआयने कापूस आयात करण्यासाठी आणि कच्च्या कापूस खरेदीसाठी एक कॅनालायझिंग एजन्सीची भूमिका बजावली आणि उद्योजकांना आवश्यक किंमतींचा आधार दिला. कापड गिरण्यांसाठी कच्चा कापूस खरेदी करणे.

देशातील बदलत्या कापूस परिस्थितीनुसार सीसीआयची भूमिका आणि कार्य वाढतच गेले. आता, CCI ची प्रमुख भूमिका किंमत समर्थन ऑपरेशन्स हाती घेणे आहे, जेव्हा जेव्हा कापसचे बाजार भाव सरकारने घोषित केलेल्या किमान आधारभूत किंमती (MSP) च्या खाली येतात.

भारताचे, कोणत्याही परिमाणात्मक मर्यादेशिवाय. MSP ऑपरेशन्स व्यतिरिक्त, देशांतर्गत वस्त्रोद्योगाच्या कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी, विशेषतः दुबळ्या हंगामासाठी, CCI व्यावसायिक खरेदी ऑपरेशन्स हाती घेते.

तर अशा पद्धतीने सीसीआय कापूस खरेदी करणार असल्याने शेतकरी बांधवाना फायदा होणार आहे. सीसीआय नेमका किती कापूस खरेदी करेल हे अजून स्पष्ट नाही सीसीआयने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कापसाचे दर नक्कीच वाढतील मात्र सीसीआयची खरेदी कमी राहिल्यास बाजाराला आधार भाव मिळण्याची शक्यता राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *