सौर कृषी पंप वितरणास होणार सुरुवात solar pump GR 2023

सौर कृषी पंप वितरणास होणार सुरुवात solar pump GR 2023

सौर कृषी पंप वितरणास लवकरच सुरुवात होणार आहे आणि या संदर्भातील जी आर देखील नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

जे शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे कारण सौर कृषी पंप योजनेस आता गती मिळणार आहे.

या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

दिनांक 12 मे 2019 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार कुसुम अभियानाच्या पारेषण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब अंतर्गत ऑगस्ट 2022 साठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला एकूण २ लक्ष  सौर कृषी पंप मंजूर करण्यात आलेले आहेत.

सदरचे दोन लाख पारेषण विरहीत सौर कृषी पंपापैकी आपणाला माहितच असेल कि एक लाख पारेषण विरहित सौर कृषी पंपाची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे केली जाते. सौर कृषी पंप वितरणास लवकरच सुरुवात होणार असल्याने शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

पेमेंट पेंडिंग शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप.

केंद्र शासनाने आता उर्वरित जे १ लाख सौर कृषी पंपाना मंजुरी दिली आहे त्याची अमलबजावणी स्टेट नोडल एजन्सी करणार आहे. स्टेट नोडल एजन्सी म्हणजेच महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण करणार आहेत.

नव्याने मंजूर केलेल्या एक लाख पारेषण सौर कृषी पंपाची अंमलबजावणी स्टेट मॉडेल एजन्सी म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यामार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी म्हणजेच पेड पेंडिंग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्या शेतकरी बांधवानी सौर कृषी पंप योजनेसाठी पैसे भरलेले आहेत परंतु अद्याप त्यांना सौर कृषी पंप मिळालेला नाही अशा शेतकरी बांधवाना आता लवकरच सोलर पंप मिळणार आहे.

या बाबतचा शासन निर्णय दिनांक ०९ जानेवारी २०२३ रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.

जी आर पहा

पंप वितरणास लवकरच होईल सुरुवात

तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला माहित असेलच कि महाराष्ट्र राज्यामध्ये सौर कृषी पंप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाउर्जामार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहेत. या महाउर्जा पोर्टलवर सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहेत या शासन निर्णयाच्या ३ नंबरच्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर शहरीज लोकसंख्या वगळता ग्रामीण भागातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंखेच्या समप्रमाणात सौर कृषी पंपाची संख्या निर्धारित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पुढील लेख पण वाचा सौर कृषी पंप कोटा उपलब्ध यादी पहा

ग्रामीण भागामध्ये असे चित्र देखील खूप मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत आहे कि एखादा शेतकरी शासनाच्या अनुदानावर सौर कृषी पंप खरेदी करतो आणि चढ्या दराने तो इतरांस विक्री करतो.

आता यापुढे शासकीय अनुदानावर मिळालेला सौर कृषी पंप शेतकऱ्याने दुसऱ्यास विकल्यास त्या शेतकऱ्यास शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि याची सर्व जबाबदारी महाउर्जा आणि महावितरणवर राहील अशी सूचना देखील या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे.

तर शेतकरी बांधवांसाठी नक्कीच हि आनंदाची बातमी होती कारण बऱ्याच शेतकरी बांधवानी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले होते परंतु त्यांना अद्याप सौर कृषी पंप मिळाले नव्हते. आता अशा शेतकरी बांधवाना लवकरच सौर कृषी पंप मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *