15 हजार रुपये रक्कम मिळणार मंत्री मंडळ बैठकीत मान्यता.

15 हजार रुपये रक्कम मिळणार मंत्री मंडळ बैठकीत मान्यता.

शेतकऱ्यांना 15 हजार रुपये रक्कम मिळणार असल्याची घोषणा मंत्री मंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाकडून 1 हजार कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देखील दिलेली आहे.

राज्यातील धान उत्पादकांसाठी खुश खबर आहे कारण आता धान उत्पादकांना प्रती हेक्टर 15 रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

महाराष्ट्र राज्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत अशा उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड construction labor smart card

केवळ धान उत्पादकांना मिळणार 15 हजार रुपये रक्कम

धान उत्पादकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी 1 हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.

प्रती हेक्टर 15 रुपये प्रोत्साहनपर रक्कम योजनेचा लाभ राज्यातील अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नुकतेच हिवाळी अधिवेशन झालेले आहे. धान उत्पादकांसाठी 15 हजार रुपये प्रती हेक्टरी अनुदान संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

रक्कम 2 हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

2022-23 या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. 

मागील वर्षी म्हणजेच 2021-22 खरीप हंगामात 1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल धान खरेदी झाली होती.  पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. 

या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल 700 रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. 

5 लाख शेतकरी बांधवानी केली नोंदणी

ज्या शेतकऱ्यांकडे 50 क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशा शेतकरी बांधवांच्या नावे 50 क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग उद्भवले.  त्याचप्रमाणे शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या वर्षी म्हणजेच 2022-23 योजनेकरिता धान उत्पादक सुमारे 5 लाख शेतकरी बांधवानी नोंदणी केली असून एकूण 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झालेले आहे.

त्यामुळे तुम्ही जर धान उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.

प्रोत्साहन रक्कम किती मिळणार?

१५ हजार रुपये प्रती हेक्टर या प्रमाणे शेतकरी बांधवाना हि रक्कम मिळणार आहे.

किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल?

अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोणते शेतकरी असतील पात्र?

केवळ धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *