शेत तेथे मत्स्यतळे योजना shet tethe matsytale  नवीन योजना राबविली जाणार

शेत तेथे मत्स्यतळे योजना shet tethe matsytale  नवीन योजना राबविली जाणार

जाणून घेवूयात शेत तेथे मत्स्यतळे योजना संदर्भातील नवीन माहिती या लेखामध्ये.

शेतीमध्ये शेततळ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. शेततळ्यामुळे कोरडवाहू जमीन बागायती झाल्याने शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झालेली आहे. शिवाय शेततळे करण्यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळत असल्याने बरेच शेतकरी शेततळ्याकडे वळतांना दिसत आहेत.

शेततळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठवणूक केल्याने त्याचा पिकांना फायदा होतो. शिवाय या साठविलेल्या पाण्यामध्ये मत्स्यपालन करून अधिकच नफा देखील शेतकरी बांधव मिळवू शकतात.

मत्स्यपालन केल्याने अधिकचा व्यवसाय शेतकरी बांधव करू शकत असल्याने शेतकरी बांधवांचा आणखी एक नवीन उत्पन्नाचा स्त्रोत वाढतो.

लवकरच सुरु होणार शेत तेथे मत्स्यतळे योजना

सध्या मासे उत्पदान व्यवसायास खूप वाव निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये चांगल्या दर्जाच्या माशांना मागणी वाढत असल्याने मत्स्यव्यवसाय शेतीस खूप मागणी वाढलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे शेततळे असेल तर मत्स्यव्यवसाय करून देखील तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

खालील व्हिडीओ पहा.

बरेच शेतकरी बांधव त्याच्या शेततळ्यामध्ये मत्स्यव्यवसाय करत असतात त्यामुळे आता जे शेतकरी बांधव मत्स्यव्यवसाय करू इच्छित असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता शेततळ्यालामध्ये मत्स्यपालन व्यवसाय करण्यास शासनाकडून अनुदान मिळणार आहे.

शेत तेथे मत्स्यतळे योजना shet tethe matsytale  राज्यामध्ये लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी केली आहे.

पुढील माहिती पण वाचा शेततळे ठिबक सिंचन मोटर इ साठी निधी आला असा करा ऑनलाईन अर्ज

शासनाकडून मिळणार मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी मासेमारी सोबतच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायशेतीवर भर देण्याची ठरवले असून त्याकरता विविध योजना सुरू केलेल्या आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाकरता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्याच धर्तीवर राज्यानेही गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय शेतीवर भर देण्याचे ठरवले आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती क्षमता असून हा व्यवसाय निर्यातक्षम आहे मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेत मत्स्यपालन क्षेत्राचे योगदान मोठे असणार आहे.

पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने शेततळ्यामुळे कोरडवाहू शेतीस नवसंजीवनी मिळाली असून आता यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करता येणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी अधिक सुलभ झाले आहे.

आजवर सागरात केवळ मासेमारी चालत आली आहे सागरी मत्स्य संवर्धन किंवा सागरी मत्स्य पालन या विषयावर फार भर दिला गेला नव्हता.

बातमी वाचा

पारंपारिक मत्स्य व्यवसायात केवळ सागरी मासेमारीवर भर दिला जातो. धरण तळे तलावाच्या गोड्या पाण्याच्या जलाशयात मात्र मत्स्यबीज संवर्धन, पिंजऱ्यातील मत्स्यपालन अशा प्रकारे मत्स्य पालन केले जाते.

आता समुद्रातही पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाने ठरवले असून लवकरच या विषयातील विस्तृत घोषणा जाहीर करण्यात येणार आहे असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

कशी आहे शेत तेथे मत्स्यतळे योजना?

या योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करण्यासाठी शासनाकडून मदत मिळणार आहे.

कधी सुरु होणार हि योजना?

हि योजना लवकरच सुरु होणार आहे अधिक माहितीसाठी लेख वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *