website thumbnail not showing on whatsapp या समस्येवरील सोपा उपाय.

website thumbnail not showing on whatsapp या समस्येवरील सोपा उपाय.

जाणून घेवूयात व्हॉटस्ॲप पोस्ट संदर्भातील माहिती म्हणजेच website thumbnail not showing on whatsapp.

तुम्ही जर ब्लॉग पोस्ट लिहित असाल आणि ती पोस्ट व्हॉटस्ॲपवर शेअर करतांना फिचर इमेज दिसत नसेल तर ती का दिसत नाही या मागील शक्यता काय आहे हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  म्हणजेच No thumbnail image when i share a link on whatsapp याचे सोल्युशन आपण बघणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

व्हॉटस्ॲप हे समाज मध्यम सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. तुम्ही ब्लॉगर असाल आणि तुम्हाला तुमच्या ब्लॉगची पोस्ट व्हॉटस्ॲपवर शेअर करतांना त्या पोस्टचा इमेज प्रीव्हू दिसत नसेल तर ती पोस्ट शेअर करतांना आकर्षक वाटत नाही. यामुळे तुम्ही शेअर केलेल्या लिंकवर कमी क्लिक होण्याची शक्यता असते.

उलट तुम्ही शेअर केलेल्या लिंकची फिचर इमेज दिसत असेल तर ती पोस्ट अधिक आकर्षक वाटते आणि शेअर केलेल्या लिंकला क्लिक देखील अधिक मिळतात.

त्यामुळे तुम्ही शेअर केलेल्या पोस्टची लिंकची इमेज दिसत नसेल तर ती दिसण्यासाठी त्यासाठी काय करावे लागेल या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

website thumbnail not showing on whatsapp

जेंव्हा आपण आपल्या ब्लॉगची पोस्ट इतर सोशल मिडिया प्लॅटफार्म्सवर शेअर करत असतो त्यावेळी OG image preview दिसत असतो.

तुम्हाला कदाचित माहितच असेल कि  OG image म्हणजे काय. OG प्रतिमा ही अशी प्रतिमा आहे जी तुम्ही तुमच्या सोशल मिडिया प्लॅटफार्म्सवर वेबसाइट ब्लॉग किंवा व्हिडिओ कंटेंट शेअर करता म्हणजेच पोस्ट करता तेव्हा त्या ठिकाणी त्या पोस्ट संदर्भातील इमेज दिसते.

हा मेटा टॅगच्या एका महत्त्वाच्या गटाचा भाग देखील असतो जो फेसबुक, लिंक्डइन, पिंटरेस्ट आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर तुमच्या ब्लॉग पोस्टची प्रतिमा दाखवीत असतो.

OG image प्रीव्ह्यू न दिसण्याचे कारण SEO Plug in असू शकते

कधी कधी तुमच्या ब्लॉगची पोस्ट इतर सोशल मिडिया प्लॅटफार्म्सवर जसे कि फेसबुक ट्वीटर किंवा इतर समाज माध्यमांवर शेअर केली असता त्या पोस्टचा प्रीव्हू दिसतो. मात्र त्याच पोस्टचा फिचर इमेजचा प्रीव्हू व्हॉटस्ॲपवर दिसत नाही. featured image not showing when sharing in whatsapp.

व्हॉटस्ॲपवर वेबसाईट पोस्ट प्रीव्हू न दिसण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी वापरत असलेले SEO Plug in होय.  

आपल्या ब्लॉगची पोस्ट रँक करण्यासाठी अनेक ब्लॉगर yoast seo plugin किंवा rank math seo plugin चा वापर करत असतात. तुम्ही जर rank math seo plugin वापरत असाल तर अशा प्लगीनमध्ये OG image optimize केली जाते.

परंतु तुम्ही जर yoast seo plugin वापरत असाल तर या ठिकणी थोडी समस्या उद्भवू शकते. अशावेळी तुम्ही तुमचे seo plugin बदलून बघा. नक्कीच तुमच्या समस्याचे निवारण होऊ शकते.

ब्लॉग पोस्ट व्हॉटस्ॲपवर शेअर केल्यानंतर OG image इमेज प्रीव्हू न दिसणे यामध्ये seo plugin व्यतिरिक्त इतरही करणे असू शकतात हि बाब या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.

website thumbnail not showing on whatsapp संदर्भात आमचा प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो

आम्ही आमच्या एका ब्लॉगवर पोस्ट लिहिल्यानंतर ती व्हॉटस्ॲपवर शेअर करत होतो. हि पोस्ट इतर सोशल मिडिया प्लॅटफार्म्सवर जसे कि फेसबुक ट्वीटर किंवा टेलिग्रामवर शेअर केल्यावर OG image इमेज प्रीव्हू दिसत होता.

परंतु हीच पोस्ट व्हॉटस्ॲपवर शेअर केल्यानंतर त्या पोस्टचा OG image इमेज प्रीव्हू दिसत नव्हता. त्यानंतर आम्ही खालील प्रोसेस केली.

  • आम्ही सगळ्यात अगोदर seo plugin वापरत होतो ते निष्क्रिय केले.
  • त्यानंतर rank math seo plugin इंस्टाल केले.
  • rank math seo plugin इंस्टाल केल्यानंतर नवीन पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टची लिंक व्हॉटस्ॲपवर शेअर केली.
  • जसीहि आम्ही हि प्रोसेस केली त्यानंतर आमच्या पोस्टचा OG Image प्रीव्हू दिसण्यास सुरुवात झाली.
  • अगोदर जे seo plugin वापरून पोस्ट पब्लिश केल्या होत्या त्या परत अपडेट केल्यानंतर त्या पोस्टच्या OG image इमेज प्रीव्हू सुद्धा व्हॉटस्ॲपवर दिसायला सुरुवात झाली.

तर अशा पद्धतीने थोडीशी सेटिंग करून तुम्ही तुमच्या पोस्टच्या लिंकचा प्रीव्ह्यू न दिसण्याच्या समस्याचे निवारण अगदी काही मिनिटात करू शकता.

खालील व्हिडीओ पहा.

लेखाचा सारांश

तुमच्या वेबसाईटच्या पोस्टची लिंक व्हॉटस्ॲपवर शेअर केल्यानंतर फिचर इमेज प्रीव्हू दिसत नसेल featured image not showing when sharing in whatsapp त्यावेळी तुम्ही वापरत असलेले SEO Plugin बदलून बघा. नक्कीच तुमची समस्या निवारण होईल.

पोस्ट प्रीव्हू न दिसण्याचे कारण काय असू शकते?

SEO Plugin हे वेबसाईटच्या पोस्टची लिंक व्हॉटस्ॲपवर शेअर केल्यानंतर फिचर इमेज प्रीव्हू न दिसण्याचे कारण असू शकते.

पोस्ट प्रीव्हू म्हणजेच लिंकची इमेज दिसण्यासाठी काय करावे?

वेबसाईटच्या पोस्टची लिंक व्हॉटस्ॲपवर शेअर केल्यानंतर फिचर इमेज दिसत नसेल तर ती दिसण्यासाठी काय उपाय करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ सहित सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

आमच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेजला भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *