सोमवारी मिळणार 2000 रु. हफ्ता शासनाच्या वतीने अधिकृत माहिती

सोमवारी मिळणार 2000 रु. हफ्ता शासनाच्या वतीने अधिकृत माहिती

सोमवारी मिळणार २ रुपयांचा हफ्ता जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता पीएम किसान सन्मान निधीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता जमा केला जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती केंद्र शासनाच्या https://pmevents.ncog.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

पीएम किसान सन्मान निधीसाठी इकेवायसी करणे गरजेचे होते. बऱ्याच शेतकरी बांधवांना हि इकेवायसी करता आली नाही त्यामुळे या कारणास्तव अनेक शेतकरी या पीएम किसान सन्मान निधीच्या १३ व्या हफ्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

पुढील माहिती पण वाचा pm kisan nidhi payment proceed असे चेक करा पैसे आले कि नाही

सोमवारी मिळणार २ रुपयांचा हफ्ता ९ लाख शेतकरी झाले अपात्र.

जे शेतकरी बांधव या पीएमकिसान सन्मान निधीसाठी पात्र असणार आहेत त्यांची संख्या ८१ लाख एवढी आहे. मागील पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता ऑक्टोबर २०२२ मध्ये जमा करण्यात आला होता.

बऱ्याच शेतकरी बांधवानी त्यांचे आधार बँक खात्याला जोडले नाही. बँक खाते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर सलग्न असल्याने आशा खातेदारांना केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेच्या या हप्त्यातून वगळले आहे.

खालील व्हिडीओ पहा

त्यामुळे राज्यात या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या गेल्या वेळेच्या तुलनेत घटली आहे. जवळपास ९ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा १३ हफ्ता मिळणार नाही.

परंतु जे शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी पात्र झाले आहेत त्यांना मात्र उद्या म्हणजेच दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी हा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

अधिकृत माहिती पहा

दरवर्षी मिळतात ६ हजार रुपये.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान २ हजार रुपयांच्या तीन टप्प्यामध्ये दिले जाते.

बऱ्याच दिवसापासून पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता केंव्हा मिळेल याकडे शेतकरी बांधव लक्ष ठेवून होते. त्यामुळे आता शासनाच्या वतीने हि अधिकृत महिती मिळाल्याने सोमवारी शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये २ हजार रुपयांचा हफ्ता जमा केला जाणार आहे.

बातमी पहा

तुम्हाला जर कदाचित हा २ हजार रुपयांचा १३ हफ्ता मिळाला नाही तर कागदपत्रांची पूर्तता करा. अधिक माहितीसाठी तुमच्या तहसील कार्यालयातील पीएम किसान सन्मान निधी कार्यालयास भेट द्या.

तर अशा पद्धतीने सोमवारी मिळणार २ रुपयांचा हफ्ता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेतली आहे.

कधी मिळणार पीएम किसान सन्मान योजनेचा हफ्ता

सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हफ्ता जमा होणार आहे.

किती शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनांचा लाभ

८१ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १३ वा हफ्ता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *