बीजभांडवल योजनेसाठी bij bhandval karj yojana अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. जाणून घेवूयात कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
तुम्ही जर चर्मकार प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील बेरोजगार तरुणांना bij bhandval yojana अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
नोकरी नसल्याकारणाने बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे त्यामुळे तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होत नाही. अशावेळी बेरोजगारांनी त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा यासाठी शासनाच्या वतीने अशा बेरोजगार तरुणांना बीजभांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करा bij bhandwal yojana
तुम्ही जर चर्मकार समाजातील तरुण असाल तर लगेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्याकडे बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सदर करून द्या.
चालू वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्ताव beej bhandwal yojana मंडळाच्या वतीने वाटप केले जाणार आहे. हे कर्ज प्रास्तव अर्ज वाटप करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२३ हि आहे.
त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कार्यालयास भेट देवून तुमचा बीजभांडवल कर्ज प्रस्ताव विहित वेळेत सादर करून द्या.
पुढील माहिती पण पहा Beej bhandwal karj yojana बीज भांडवल कर्ज योजना सुरु प्रस्ताव द्या.
बीजभांडवल योजनेसाठी अर्ज कसा आणि कोण सादर करू शकते
चर्मकार समाजातील चांभार, ढोर, मोची, होलार या प्रवर्गातील अर्जदार या योजनेचा लाभ घेवू शकतील. या कर्ज योजनेसाठी अर्ज करतांना या अगोदर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा अर्जदारांनी लाभ घेतलेला नसावा.
पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करतांना खालीलप्रमाणे अर्ज सादर करायचा आहे.
1. कर्जासाठी जे प्रास्तव सादर केले जाणार आहेत ते तीन प्रतीत सादर करणे अनिवार्य आहे.
2. कर्ज प्रास्तव स्वतः अर्जदारांनी सादर करायचे आहेत तिसऱ्या व्यक्ती मार्फत प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.
3. तीन प्रतीत प्रास्तव सादर करतेवेळी मूळ कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
खालील कागदपत्रे आवश्यक असणार
. अर्जदाराच्या जातीचा दाखला जो कि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला असावा
2. तहसीलदार यांनी दिलेला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
3. तीन प्रतीत अलीकडे काढलेले पासपोर्ट साईज फोटो.
4. शैक्षणिक दाखला.
5. राशनकार्डची झेरॉक्स प्रत.
6. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड प्रत यापैकी एक.
7. व्यवसायाचे दरपत्रक.
8. अर्जदार ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहे त्या जागेची भाडेपावती किंवा भाडे करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा जागेचा नमुना नं. 8.
9. वीजबिल, टॅक्स पावती.
10. प्रकल्प अहवाल.
11. दोन सक्षम जामीनदार.
12. वाहनासाठी परवाना.
13. व्यवसाया संबधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र.
14. व्यवसायाचे टेक्निकल सर्टिफिकेट.
15. अनुभवाचा दाखला.
16. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे.
17. स्वयंसाक्षांकित घोषणापत्र.
वरीलप्रमाणे कागदपत्रे विहित वेळेत सादर करून कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खालील व्हिडीओ पहा.
त्यामुळे तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर या beej bhandwal karj yojana योजनेचा लाभ घ्या आणि हि माहिती गरजू मित्रांना देखील पाठवा जेणे करून ते या योजनेचा लाभ घेवू शकतील.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
९ मार्च २०२३ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या लेखामध्ये या योजनेचा जी आर लिंक देण्यात आलेली आहे.