कोतवालांना मिळणार १५ हजार मानधन महसूल मंत्र्याची घोषणा.

कोतवालांना मिळणार १५ हजार मानधन महसूल मंत्र्याची घोषणा.

कोतवालांना मिळणार १५ हजार मानधन महसूल मंत्र्याची घोषणा जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखामध्ये.

राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ होणार असून त्यांना १५ हजार मानधन मिळणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

महसूल खात्यातील सर्वात कनिष्ट पद म्हणजे कोतवाल होय. तलाठी यांच्या नियंत्रणाखाली कोतवाल काम करत असतात. गावाचे दप्तर कार्यालयात नेणे किंवा आणणे. गावातील जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी इत्यादी संबधी माहिती ग्रामसेवकास देणे हि आणि इतर कामे कोतवाल करत असतो.

पुढील माहितीपण वाचा कांदा चाळ योजना निधी आला ऑनलाईन अर्ज सुरु बघा जीआर

कोतवाल पदासाठी अनेक पदवीधारक तरुणांनी अर्ज केला होता. कोतवाल पदासाठी ७ हजार ५०० एवढे मानधन मिळत होते ते आता वाढविण्यात आले आहे. आता राज्यातील कोतवालांना ७ हजार ५०० एवजी १५ हजार रुपये एवढे मानधन मिळणार असल्याची महसूल मंत्री यांनी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्यात १२ हजार ७९३ एवढी कोतवालांची संख्या आहे. या कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

नक्कीच कोतवालवर्गासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत माहिती लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *