पूर्वी पैशांचे व्यवहार पूर्णपणे रोख रकमेने होत असत परंतु जसाहि इंटरनेटचा शोध लागला आर्थिक व्यवहार अगदी सोयीस्कर झाले आहे. इंटरनेटचा उपयोग करून पैसे इतरांना पाठविणे अगदी सहज होते.
इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याच्या इतर पद्धतीपेक्षा युपीआय अर्थात UPI Unified Payments Interface या पद्धतीचा उपयोग करून सर्वात जास्त आर्थिक व्यवहार आज घडीला केले जात आहे.
फोन पे किंवा जीपे किंवा डायरेक्ट भीम युपीआयचा उपयोग करून लगेच पेमेंट करता येते. हि तर झाली आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुलभ सुविधा.
तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील तर कधीही कोणाला पैसे पाठवू शकता किंवा हवे ते खरेदी करू शकता.
परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर काय करणार. आता खात्यात पैसे नसतील तरीही पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय अर्थात रिजर्व बँक ऑफ इंडियाने वापरकर्त्यांना क्रेडीट कार्डप्रमाणे सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
पुढील लेख पण वाचा Tractor scheme list ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या पहा तुमचे नाव
युपीआय क्रेडीट होणार लोकप्रिय
युपीआय क्रेडीट कार्ड मिळविण्यासाठी बँका व पेमेंट ॲप्स ज्या ग्राहकांना क्रेडीट देणार आहेत त्यांचे उत्पन्न किती आहे शिवाय घेतलेले पैसे परतफेड करण्याची क्षमता आहे किंवा नाही हे ठरवून युपीआय क्रेडीट देणार आहेत.
म्हणजेच आता युपीआयवर ओव्हर ड्राफ्ट किंवा क्रेडीट कार्डसारखी सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. युपीआय क्रेडीटमुळे ग्राहकांना अधिकची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील UPI Payment करत असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.
सध्या मार्केटमध्ये शॉपिंग करणे असो किंवा बाजारात भाजीपाला घेणे असो सर्व ठिकाणी युपीआय संलग्न ॲप्सचा मोठ्या प्रमाणत उपयोग केला जातो.
यामध्ये फोने पे जीपे व इतर काही ॲप्स कमालीचे लोकप्रिय झालेले आहेत. कदाचित याच बाबीचा विचार करून युपीआय क्रेडीटची कल्पना सुचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे आता खात्यात पैसे नसतील तरीही करता येणार व्यवहार.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.