पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत चेक करा. पहा कशी आहे पद्धत

पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत चेक करा. पहा कशी आहे पद्धत

जाणून घेवूयात पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत कसा तपासावा लागतो. घर बांधकाम, घर विकत घेणे, नवीन कार खरेदी किंवा इतर कोणत्याही बाबीसाठी व्यक्तीला कर्जाची आवश्यकता असते.

पूर्वी कर्ज देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे मत गृहीत धरले जात होते आणि त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. आता मात्र कर्ज देण्याची संकल्पना पूर्णपणे बदलली आहे.

कर्जासाठी आता तुमचा क्रेडीट स्कोअर विचारात घेतला जातो. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे खूपच महत्वाचे झाले आहे.

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्याआधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून बघतात आणि मगच ठरवितात कि तुम्हाला कर्ज द्यायचे आहे किंवा नाही. त्यामुळे क्रेडीट स्कोअर म्हणजेच सिबिल खूपच चांगला असणे गरजचे आहे.

पुढील माहिती देखील वाचा अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत तपासा

एव्हाना क्रेडीट स्कोअर हा शब्द तुम्ही ऐकला असेलच परंतु हे तपासाचे कोठे आणि कसे. सिबिल स्कोअर तपासण्यासाठी बऱ्याच ठिकाणी काही शुल्क आकारले जाते आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर पाहता येतो किंवा तपासता येतो.

परंतु आम्ही तुम्हाला असे एक ठिकाण सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर मोफत तपासू शकता. केवळ सिबिल स्कोअरच नव्हे तर या संदर्भात इतर महत्वाची माहिती देखील आम्ही या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहोत.

जसे कि, क्रेडीट स्कोअर वाढविण्यासाठी काय करावे लागते, सिबिल स्कोअर कमी होण्याचे कोणते करणे आहेत हे आणि इतर, आहे ना मजेशीर त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा.

क्रेडिट स्कोअर चांगले असणे का गरजेचे आहे पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत तपासा

तुमचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर कोणतीही बँक तुम्हाला लवकर कर्ज देवू शकते. चांगल्या क्रेडीट स्कोअरमुळे वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडीट कार्ड इत्यादी मिळण्यास सोपे जाते.

एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या पैशांची तुम्ही कशी परतफेड करू शकता याचे तपशील तुमचे सिबिल स्कोअर दर्शवित असते. यातून तुमची कर्ज फेड करण्याची क्षमता सिद्ध होत असते.

तुमचा क्रेडीट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला देण्यात येणाऱ्या कर्जावर कमी व्याजदर मिळू शकते. बँक किंवा वित्तीय संस्था चांगला क्रेडीट स्कोअर असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देण्यास प्राधान्य देतात. यातून त्या व्यक्तीची कर्ज फेडण्याची क्षमता सिद्ध होत असते आणि हे बँक किंवा वित्तीय संस्थेसाठी कमी धोक्याचे असते.

पैसा बाजार मोबाईल ॲपद्वारे मोफत सिबिल स्कोअर तपासला जावू शकतो. कशा पद्धतीने मोफत सिबिल स्कोअर तपासला जातो हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला देखील तुमचा मोफत सिबिल स्कोअर तपासता येईल.

असे चेक करा मोफत सिबिल स्कोअर

पैसा बाजार ॲपद्वारे सिबिल स्कोअर मोफत चेक करता येते. एवढेच नव्हे तर तुमच्या सिबिल स्कोअरचा तपशील अगदी pdf मध्ये डाउनलोड देखील करता येतो.

हि सर्व प्रक्रिया अगदी सहजतेने करता येते. तुमच्या क्रेडीट स्कोअरवर परिणाम करणारे जे प्रमुख घटक आहेत ते देखील हायलाइट करता येतात त्यामुळे तुमची क्रेडिट योग्यता सुधारण्यासाठी मदत होते.

तर लगेच जाणून घेवूयात कि पैसा बाजार मोबाईल ॲपद्वारे सिबिल स्कोअर मोफत चेक कसा करावा लागतो.

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकता.

मोफत सिबिल स्कोअर चेक करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे

सिबिल स्कोअर चेक करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

  1. android प्रणालीवर चालणाऱ्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
  2. सर्चमध्ये टाईप करा Paisabazaar mobile app.
  3. पैसा बाजार मोबाईल ॲप मोबाईलमध्ये install करून घ्या.
  4. ॲप ओपन करा.
  5. sign with mobile number या लिंकवर टच करून तुम्ही साईन इन करू शकता.
  6. मोबाईल नंबर टाका आणि Sent OTP या बटनावर टच करा.
  7. दिलेल्या चौकटीमध्ये OTP टाका Verify and proceed या बटनावर टच करा.
  8. तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि continue या बटनावर टच करा.
  9. सिबिल स्कोअर मोफत चेक करण्यासाठी Get your credit score या बटनावर टच करा.
  10. Employee type मध्ये योग्य तो पर्याय निवडा.
  11. Net monthly income मध्ये उत्पन्न टाका आणि View Report या बटनावर टच करा.
  12. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सिबिल स्कोअर दिसेल. हा सिबिल स्कोअर डाउनलोड करण्यासाठी download report या बटनावर टच करा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा.

तर अशा पद्धतीने पैसा बजारवर सिबिल स्कोअर मोफत कसा तपासावा हे आपण या लेखामध्ये जाणून घेतले आहे. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर मोफत चेक करू शकता. हि महत्वाची खालील बटनांचा उपयोग करून तुम्ही तुमची मित्रांना शेअर करू शकता.

पैसा बजार मोबाईल ॲप

मोफत सिबिल स्कोअर कोठे करावा लागतो?

सिबिल स्कोअर मोफत कोठे आणि कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

सिबिल स्कोअर कसा वाढवावा?

चांगला सिबिल स्कोअरसाठी काय करावे लागेल या संदर्भातील माहिती देखील या लेखामध्ये दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *