जाणून घेवूयात 10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये. ग्रामीण भागामध्ये लहान शेतकरी बांधवाना जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर ती तुकडाबंदी कायद्यामुळे शक्य होत नव्हते. आता मात्र हे सर्व शक्य होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे किंवा इतर कारणांमुळे थोडीशी जमीन विकण्याची वेळ येते. तुकडाबंदी कायदा लागू असल्याने जिरायत जमिनीसाठी 40 गुंठे तर बागायत जमिनीसाठी 20 गुंठे जमीन विक्री करता येत होती.
आता मात्र या कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून बागायती जमीन कमीत कमी 10 गुंठे तर जिरायती जमीन कमीत कमी 20 गुंठे विक्री करता येणार आहे.
शेत जमिनीची वाटणी 100 रुपयात Land records पहा सविस्तर.
10 गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येणार असल्याने ग्रामीण भागामध्ये गैरसोय टाळता येणार
बागायती 10 तर जिरायती 20 गुंठे जमीन विक्री करण्याचा हा शासन निर्णय केवळ ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आलेला आहे.
बऱ्याच शेतकरी बांधवाना केवळ 10 गुंठे जमीन विक्री करण्याची इच्छा असतांना त्यांना या कायद्यामुळे 20 गुंठे जमीन विक्री करावी लागत होती. घेणारा शेतकरी देखील कधी कधी केवळ 10 गुंठे जमिनीचे क्षेत्र घेऊ शकत असल्याने इच्छा नसतांनाही 20 गुंठे जमीन घ्यावी लागत होती.
त्यामुळे आता ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी हा महत्वाचा निर्णय आलेला आहे. यामुळे नक्कीच शेतकरी बांधवाना याचा फायदा होणार आहे.
अधिक माहितीसाठी बातमी पहा
नवीन नियम शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर
शेती करत असताना शेतीमध्ये पिक आले नाही तर शेतकरी बांधवाना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी बांधावा देणे करांची देणी देणे गरजेचे असते. परंतु शेत जमिनीशिवाय शेतकरी बांधवांकडे दुसरा पर्याय नसल्याने ते जमीन विक्री करतात आणि आपली आर्थिक अडचण भागवून घेतात.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
परंतु ज्या ठिकाणी केवळ 10 गुंठे जमीन विकून काम होऊ शकते अशा ठिकाणी जमीन तुकडा बंदी कायदा असल्याने शेतकरी बांधवा 20 गुंठे जमीन विकावी लागत होती. त्याचप्रमाणे जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती देखील केवळ 10 गुंठे खरेदी करण्याइतपत असल्याने नाहक त्या शेतकऱ्याला २० गुंठे शेत जमीन विकत घ्यावी लागत होती.
त्यामुळे शासनाने अनेलेला आताचा नवीन नियम हा गरमीन भागातील शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
तुकडाबंदी कायद्यानुसार पूर्वी बागायत 20 गुंठे तर जिरायत जमीन 40 गुंठे एवढ्या क्षेत्राची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी केली जात होती. आता मात्र यामध्ये बदल करण्यात आला असून बागायत क्षेत्र 10 तर जिरायत क्षेत्र 20 गुंठे एवढ्या क्षेत्राची खरेदी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कमीत कमी 10 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा हा नवीन नियम केवळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे.
या नवीन नियमामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी यांना या नवीन नियमाचा फायदा होणार आहे.