दुष्काळ नुकसान अनुदान मिळविण्यासाठी लगेच पिक विमा कंपनीस माहिती द्या पहा कशी आहे पद्धत.

दुष्काळ नुकसान अनुदान मिळविण्यासाठी लगेच पिक विमा कंपनीस माहिती द्या पहा कशी आहे पद्धत.

शेतकरी बंधुंनो दुष्काळ नुकसान अनुदान मिळविण्यासाठी लगेच पिक विमा कंपनीस माहिती द्या.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे.

तुम्ही जर तुमच्या शेतातील पिकांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत विमा काढलेला असेल तर लगेच तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती पिक विमा कंपनीस द्या. जेणे करून पिक विमा कंपनीकडून तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकेल.

तुम्ही तुमच्या पिकाचा प्रधानमंत्री फासल बिमा योजना २०२३ अंतर्गत पिक विमा काढलेला असेल आणि तुमच्या शेतातील पिकांचे दुष्काळामुळे खूप मोठे नुकसान झाले असेल तर जाणून घ्या कशा पद्धतीने पिक विमा कंपनीस या नुकसानीची सूचना ऑनलाईन पद्धतीने दिली जाते.

दुष्काळ नुकसान अनुदान मिळविण्यासाठी पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना देण्याची पद्धत

क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस देवू शकता. शासनाने वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पिक विमा कंपन्या नेमून दिलेल्या आहेत. तुमच्याकडे असलेल्या पिक विमा पावतीवर तुमच्यासाठी नेमून दिलेल्या पिक विमा कंपनीचे नाव असते.

ज्या पिक विमा कंपन्या आहेत त्यांचे स्वतःचे एक ॲप असते त्याद्वारे देखील तुम्ही पिक विमा कंपनीस पिक नुकसानिची सूचना देवू शकता.

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन द्वारे पिक नुकसानभरपाईसाठी दावा करा.

पिक विमा कंपनीस द्या नुकसानीची सूचना

उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी universal sompo general insurance हि कंपनी नेमून देण्यात आलेली आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या कंपनीच्या ॲपद्वारे देखील तुमच्या शेतातील पिकांची नुक्सांची सुंचा पिक विमा कंपनीस देवू शकता.

परंतु तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तर तुमच्याकडे असलेल्या पिक विमा पावतीवर सर्वात खाली पिक विमा कंपनीचे नाव दिलेले असते त्या कंपनीशी तुम्ही संपर्क साधू शकता.

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर त्यासाठी universal sompo general insurance या कंपनीच्या वेबसाईटवरून पिक नुकसानीची सूचना कंपनीस कशी द्यावी या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

क्रॉप इन्सुरन्स ॲप सर्वात सोपी पद्धत

कोणत्याही कंपनीचे विशेष ॲप न वापरता देखील पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस देता येते. क्रॉप इन्सुरन्स ॲपद्वारे पिक नुकसानीची सूचना दिल्यास ती आपोआप संबधित कंपनीस पोचविली जाते. त्यामुळे क्रॉप इन्सुरन्स ॲप हे पिक नुकसानीची सूचना देण्याचे सर्वात प्रभावी मध्यम आहे.

क्रॉप इन्सुरन्स ॲप कसे वापरावे या संदर्भात तुम्हाला माहिती नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओ व त्या संदर्भातील माहिती तुम्ही बघू शकता व दुष्काळ अनुदान मिळवू शकता.

दुष्काळ अनुदान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे?

प्रधानमंत्री फासल बिमा योजना अंतर्गत शेतातील पिकांचा पिक विमा उतरविला पाहिजे. त्यानंतर जर तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीस कळविले पाहिजे.

पिक विमा कंपनीस नुकसानीची माहिती कशी द्यावी?

ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कळविता येते.

ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो?

पिक विमा कंपनीस नुकसानीची माहिती देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येते. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे. शिवाय माहितीचा व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *