अशी करा ई पिक पाहणी दुरुस्ती पर्याय केवळ 48 तासासाठीच उपलब्ध.

अशी करा ई पिक पाहणी दुरुस्ती पर्याय केवळ 48 तासासाठीच उपलब्ध.

जाणून घ्या ई पिक पाहणी दुरुस्ती कशी करावी लागते. ई पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंदणी करतांना चूक झाली तर ती दुरुस्त कशी करावी किंवा माहिती नष्ठ कशी करावी या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बऱ्याच वेळेश शेतकरी बांधवांकडून ई पिक पाहणी करतांना पेरणीचा दिनांक चुकण्याची शक्यता असते अशावेळी शेतकरी बांधवाना हि माहिती दुरुस्त करण्यासाठी पर्याय देण्यात आलेला आहे.

तो पर्याय वापरून दुरुस्ती कशी करावी किंवा संपूर्ण डाटा नष्ठ करून परत पिकांची माहिती कशी नोंदवावी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

ई पिक पाहणी दुरुस्ती

ई पिक पाहणी करणे शेतकरी बांधवांसाठी गरजेचे झालेले आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवाना स्मार्ट फोनचा उपयोग करता येत नाही किंवा कधी तर हे इ पिक पाहणी ॲप व्यवस्थित काम करत नाही.

मोबाईल नेटवर्क तांत्रिक समस्या अशा अनेक कारणांमुळे हे इ पिक पाहणी ॲप वापरतांना शेतकरी बांधवाना समस्येचा सामना करावा लागत आहे.

ई पिक पाहणी संदर्भात डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर या संदर्भात मार्गदर्शनपर व्हिडीओ देखील बनविण्यात आले. ई पिक पाहणी ॲप वापरून शेतातील पिकांची नोंद कशी करावी या संदर्भात अलीकडेच एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. तो व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस नेटवर्कच्या सामेस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस इच्छा असूनही ई पिक पाहणी करता येत नाही.

पुढील माहिती पण वाचा e peek pahani 2023 खरीप हंगाम ई पिक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी.

दुरुस्ती कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

शेतकरी बांधवाना ई पिक पाहणी करतांना काही अडचण येत असेल आणि लगेच मदत हवी असेल तर ई पिक पाहणी या ॲपमध्ये मदत नावाचे बटन देण्यात आलेले आहेत.

त्यावर टच करून शेतकरी बांधव कस्टमर केअरशी लगेच संपर्क साधून संबधित अडचणीसंदर्भात समाधान मिळवू शकतात.

शेतकरी बांधवानी इ पिक पाहणी करतांना काही चूक केली असेल आणि ती तुम्हाला सुधारायची असेल तर त्याची प्रोसेस कशी असते या संदर्भात शेतकरी बांधवाना माहिती असणे खूपच गरजेचे आहे.

या ठिकाणी आम्ही शेतकरी बांधवासाठी एक व्हिडीओ खास करून तयार केलेला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर शेतकरी बांधव अगदी सहजतेने इ पिक पाहणी दुरुस्ती करू शकतात.

ई पिक पाहणी करणे गरजेचे

जर शेतकरी बांधवानी त्याच्या शेतातील पिकांची नोंदणी ई पिक पाहणी ॲपद्वारे केली नाही तर जमिनीचे क्षेत्र हे पडीक म्हणून सातबाऱ्यावर नोंदविले जाते.

शिवाय एखाद्या योजनेचा लाभ हवा असेल तर अशावेळी देखील इ पिक पाहणी करणे खूप गरजेचे असते. उदारणार्थ कांदाचाळ योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला आणि या योजनेसाठी तुम्ही पात्र झालात तर त्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावर कांदा या पिकाची नोंद असणे गरजेचे आहे.

तुमच्या सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद हि तुम्हालाच करावी लागत असल्याने अशावेळी तुम्ही अशा योजनेपासून वंचित राहू शकता.

त्यामुळे वेळेच्या आत आपल्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी करणे खूपच गरजेचे आहे.

या लेखामध्ये आपण जाणून घेतलेले आहे कि इ पिक पाहणी करणे का गरजेचे आहे तसेच इ पिक पाहणी दुरुस्ती कशी करावी.

ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ई पिक पाहणी दुरुस्ती कशी करावी.

शेतकरी बांधवाना ई पिक पाहणी ॲपमध्येच दुरुस्ती करण्याचा पर्याय मिळतो. या पर्यायावर क्लिक करून दुरुस्ती करता येते.

किती वेळासाठी करता येते दुरुस्ती

४८ तासांमध्ये ई पिक पाहणी दुरुस्ती करता येते. हि दुरुस्ती कशी करावी लागते या संदर्भातील व्हिडीओ या लेखामध्ये दिलेला आहे. तो बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *