जाणून घेवूयात ई पीक पाहणी यादी कशी बघावी. अनेक शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी नोंदणी करण्यास अडचण येत आहे परंतु तुम्ही जर हि ई पीक पाहणी नोंदणी केली नाही तर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांना मोबाईलचा उपयोग करता येत नाही अशा शेतकरी बांधवानी इतर शेतकरी बांधवांकडून ई पीक पाहणी नोंदणी करून घेतली आहे.
परंतु तुमची ई पिक पाहणी झाली आहे किंवा नाही हे कसे ओळखावे या संदर्भात आमच्याकडे अनेक शेतकरी बांधवानी विचारणा केली त्यामुळे या संदर्भात आपणास माहिती देणे आम्हाला महत्वाचे वाटत आहे.
e peek pahani 2023 खरीप हंगाम ई पिक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी.
ई पीक पाहणी यादी कशी बघावी या संदर्भातील व्हिडीओ पहा
या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कि ई पीक पाहणी अँपचा उपयोग करून कशा प्रकारे तुम्ही जाणून घेवू शकता कि तुमच्या पिकांची इ पिक पाहणी झाली आहे किंवा नाही.
अर्थात ई पीक पाहणी नोंदणी कशी करावी या संदर्भात मी एक व्हिडीओ बनविला होता त्यामध्ये देखील मी या संदर्भात ओझरती माहिती दिली होती.
तरी देखील आज या संदर्भात सविस्तर माहितीचा खास व्हिडीओ घेवून येत आहे जेणे करून तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी अँपद्वारे नोंदणी झाली आहे किंवा नाही हे समजण्यास तुम्हाला सोपे जाईल.
चला तर थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात तुमच्या संपूर्ण गावाची ई पिक पाहणी यादी कशी बघावी तसेच तुमच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी अँपद्वारे नोंदणी झाली आहे किंवा नाही हे कसे बघावे.
ई पीक पाहणी यादी बघण्याची खालील पद्धत पहा
- तुमच्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी अँप ओपन करा नसेल तर गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून घ्या.
- विभाग निवडा.
- खातेदारांचे नाव निवडा.
- ४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा.
- या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर टच करा.
- पिकांची माहिती पहा या पर्यायावर टच करा.
- जसेही तुम्ही पिकांची माहिती या पर्यायावर टच कराल त्यावेळी तुम्ही नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
अशी पहा पिक पाहणी नोंदणी यादी
तुमच्या गावातील किती लोकांनी ई पिक पाहणी अँपद्वारे नोंदणी केली आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती देखील तुम्ही याच e peek pahani app वर बघू शकता.
त्यासाठी मुख्य मेनूवर जा. या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल त्यामधील गावाचे खातेदारांची पिक पाहणी या पर्यायावर टच करा.
जसेही तुम्ही या पर्यायावर टच कराल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या गावातील सर्व नागरिकांची e peek pahani list दिसेल. यामध्ये ज्यांनी e peek पाहणी केली आहे त्यांच्या नावाच्या खाली हिरवा रंग असेल तर ज्यांची ई पिक पाहणी बाकी असेल त्यांच्या नावाच्या खाली पांढरा रंग तुम्हाला दिसेल.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील e peek pahani list ऑनलाईन पाहू शकता.
e peek pahani app चा उपयोग करून तुम्ही तुमच्या गावातील नागरिकांची ए पिक पाहणी यादी बघू शकता.
२५ सप्टेंबर २०२३ ही इ पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे.