10 लाख रुपये भांडवल मिळणार ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर

10 लाख रुपये भांडवल मिळणार ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर

नवकल्पनांना वाव मिळावा यासाठी 10 लाख रुपये भांडवल मिळणार आहे. अर्ज कोठे आणि कसा करावा या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती या लेखामध्ये.

सगळ्यात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की पहा म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

तुमच्याकडे जर नवीन कल्पना असेल तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप अंतर्गत १० लाख रुपये भांडवल मिळणार आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या योजनेंतर्गत हा लाभ मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ हि आहे.

या संदर्भात MAHARASHTRA DGIPR यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर माहितीचे ट्वीट करण्यात आले आहे.

https://x.com/MahaDGIPR/status/1703761781032624489?s=20

ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थ्यांना हि चांगली सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. यामध्ये भाग घेवून विद्यार्थी १० लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळवू शकतात.

उद्योगासाठी 10 लाख रुपये भांडवल मिळणार

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाकडून नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे.

या धोरणा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना वास्तव स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी 10 लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळवू शकतात.

बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

विद्यार्थी व संस्था यांना मिळणाऱ्या बक्षिसांचा तपशील खालीलप्रमाणे

तालुकास्तर

उत्तम 3 विजेत्यांना रोख पारितोषिके,

जिल्हास्तरावर सर्वोत्तम 10 विजेत्यांना प्रत्येकी रु.1 लाखाचे बीज भांडवल,

राज्यस्तरावर सर्वोत्तम 10 विजेत्या नद्योजकांना प्रत्येकी रु.5 लाखांचे बीज भांडवल.

विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम, शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

असा करा ऑनलाईन अर्ज

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी अर्ज कोठे कराल हा होय. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी कशी करावी लागते या संदर्भात माहितीची pdf दिली आहे.

हि pdf download करा.

वरील pdf बघितल्यावर ऑनलाईन नोंदणी करण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता लगेच तुमची ऑनलाईन नोंदणी करून घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थोड्यात खालील प्रोसेस करा.

https://www.msins.in/ या वेबसाईटवर जा किंवा येथे क्लिक करा.

वेबसाईट ओपन झाल्यावर आत्ताच सहभागी व्हा किंवा apply now असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

परत एक पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील

  • Institution registration.
  • Innovator registration.
  • jury registration.

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर वरीलपैकी innovator registration या पर्यायावर क्लिक करा. जसेही तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल तर हा अर्ज ओपन होईल.

ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.

किती मिळेल कर्ज?

या योजना अंतर्गत लाभार्थीला १० हजार रुपये भांडवल मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ या लेखामध्ये दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *