पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जी आर

पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जी आर

आनंदाची बातमी पिक विम्याचा मार्ग मोकळा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीएवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे. अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे.

सविस्तर सविस्तर माहितीसाठी या लेखाच्या सर्वात व्हिडीओ दिलेला तो नक्की बघा.

ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसानभरपाई मिळणार आहे.

या संदर्भात शासनाने १८ सप्टेंबर २०२३ रोजी जी आर काढलेला आहे.

annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

पिक विम्याचा मार्ग मोकळा

राज्याच्या हिश्यापोटी शासनाने विमा कंपन्यांना 61 कोटी 92 लाख 35 हजार 981 रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. महाराष्ट्र राज्यात ५ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा योजना राबवली आहे.

प्रधानमंत्री फासल बिमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पीक विमा उतरवला होता.

केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिली जाते.

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान मिळणार भरपाई

अनेक जिल्ह्यामध्ये मोठे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्याने पिकांचे नुकसान झाले त्यामुळे विमा कंपनीकडून पिक विमा अंतर्गत नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहेत.

भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार भारतीय कृषी विमा कंपनी विम्याची मागणी केली होती. त्यामुळे खालील विमा कंपन्याना हा निधी वर्ग केला जाणार आहे.

विमा कंपन्यांना निधी वितरीत

भारतीय कृषी विमा

बजाज अलीयांझ जनरल इन्शुरन्स कंपनी

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी

एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी.

या पाचही विमा कंपन्यांना 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयांचा राज्याचा हिस्सा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

राज्याचा हिस्सा कंपन्यांना प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकरच मिळणे अपेक्षित आहे जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतीक्षा लागली आहे.

शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढून घेतला पाहिजे कारण पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून यासाठी नुकसानभरपाई मिळू शकते.

अशाप्रकारे पिक विम्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शेतकरी बांधवाना आर्थिक मदत मिळणार आहे.

जी आर लिंक

कधी मिळेल पिक नुकसानभरपाई?

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच मिळू शकते कारण या संदर्भात नुकताच शासन निर्णय जरी करण्यात आलेला आहे.

पिक विमा नुकसानभरपाई जी आर कोठे पाहावा?

महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर हा जी आर आलेला आहे किंवा या लेखामध्ये या जी आरची लिंक तुम्हाला मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *