असे करा व्हॉटस्ॲप चॅनल तयार whatsapp channel create process in marathi language

असे करा व्हॉटस्ॲप चॅनल तयार whatsapp channel create process in marathi language

असे करा व्हॉटस्ॲप चॅनल तयार

जसे युट्युब चॅनल असते अगदी तसाच पद्धतीने आता व्हॉटस्ॲप चॅनल तयार करता येतो. जाणून घ्या कशी आहे पद्धत.

प्ले स्टोरवरून व्हॉटस्ॲप इंस्टाल करा किंवा तुमच्याकडे अगोदरच व्हॉटस्ॲप इंस्टॉल असेल तर अपडेट करून घ्या.

हि माहिती व्यवस्थित समजण्यासाठी या पेजच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो पहा आणि त्या प्रमाणे कृती करून तुमचे व्हॉटस्ॲप चॅनल तयार करून घ्या.

व्हॉटस्ॲप ओपन करा.

Agree and continue या बटनावर टच करा.

काही परवानग्या हव्या असतील त्या देवून टाका.

तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Next या बटनावर टच करा.

तुम्ही टाईप केलेला मोबाईल तुमचाच आहे का किंवा चुकला तर नाही ना याची खात्री करा आणि ok या बटनावर टच करा.

Shetkari whatsapp group link योजनांच्या माहितीसाठी जॉईन व्हा.

OTP टाकून लॉगीन करा.

आता तुमच्या मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाका बहुतांशी हा otp व्हॉटस्ॲप द्वारे आपोआप घेतला जातो.

तुमच्या फोनमधील contacts आणि media हाताळण्याची व्हॉटस्ॲप ला परवानगी द्या.

इतर काही परमिशन्स हव्या असतील त्या देवून टाका.

तुम्ही या अगोदर व्हॉटस्ॲप वापरत असाल आणि काही कारणास्तव तुम्ही फोन बदलला असेल आणि या परिस्थितीमध्ये तुमच्या गुगल ड्राईव्हवर व्हॉटस्ॲप data असेल तर तो backup घेण्यासाठी गुगल ड्राईव्हची परमिशन द्या.

तुमचे नाव आणि फोटो निवडा किंवा या अगोदर व्हॉटस्ॲप वापरत असेल तर फक्त Next या बटनावर टच करा.

अशा पद्धतीने तुमचे व्हॉटस्ॲप खाते सुरु झालेले आहे.

असे करा व्हॉटस्ॲप चॅनल तयार व्हॉटस्ॲप चॅनल तयार करण्याची पद्धत

updates असा पर्याय दिसेल त्यावर टच करा. या ठिकाणी बरेच व्हॉटस्ॲप चॅनल तुम्हाला दिसतील. लोकप्रिय व्हॉटस्ॲप चॅनल तुम्ही फॉलो करू शकता.

तुमचे स्वतःचे किंवा ब्रँडचे व्हॉटस्ॲप चॅनल सुरु करण्यासाठी channel या पर्यायासमोर दिसत असलेल्या अधिक (प्लस) या पर्यायावर टच करा.

agree and continue या पर्यायावर टच करा.

channel name या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमच्या व्हॉटस्ॲप चॅनलचे नाव लिहा.

दुसऱ्या पर्यायामध्ये तुमचे व्हॉटस्ॲप चॅनल कशा संदर्भात आहे त्या विषयी सविस्तर माहिती लिहा.

सर्वात शेवटी create channel असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.

झाले तुमचे व्हॉटस्ॲप चॅनल तयार.

व्हॉटस्ॲप चॅनल असे customize करा

फोटो या पर्यायावर टच करून तुम्ही तुमच्या चॅनलचा फोटो अपलोड करू शकता.

व्हॉटस्ॲप चॅनल तयार झाला असून तुमच्या चॅनलमध्ये लोकांना समाविष्ट करण्यासाठी तुमच्या व्हॉटस्ॲप चॅनलची लिंक विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *