२५ टक्के अग्रिम देण्याचे शासनाने सूचित करूनही पिक विमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करत होत्या. पिक विमा कंपन्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे आवाहन केले होते.
परंतु आता पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि पिक विमा रक्कम जमा होणार आहे.
मध्यंतरी पावसाचा जो खंड पडला होता त्या बाबत पिक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्ताकडे अपील केले होते. आता हे अपील फेटाळण्यात आले असून मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील सुमारे 5000 गावातील शेतकऱ्यांना पिक विम्याची 25% अग्रिम रक्कम मिळणार आहे.
फळपिक विमा 2023 निधी आला पहा शासनाचा नवीन जी आर
पावसाने मारलेल्या दडीमुळे सुमारे 40 लाख हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान
हि अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार आहे. पिक विमा मिळण्याचा जो अडथळा होता तो आता मोकळा झाला आहे. मराठवाड्यात जून पासून सप्टेंबर अखेर पर्यंत 112 दिवसात सरासरी 40 दिवसच पाऊस पडला आहे.
ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेला तर 250 मंडळात 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड निर्माण झाला होता.
नांदेड आणि हिंगोली जिल्हा वगळता बाकीच्या जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. पावसाने मारलेल्या दडीमुळे सुमारे 40 लाख हेक्टरवरील कापूस, मका, सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
प्रधान मंत्री फासल बिमा योजना अंतर्गत शेतातील पिकांना विमाचे कवच मिळावे यासठी मराठवाड्यातील 81 लाख 11 हजार 374 शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज केले आहेत.
त्यापोटी 23 हजार 776 कोटी 66 लाख एवढी रक्कम भरली आहे.
पिक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा आदेश
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची आनेवारी अद्याप ठरलेली नाही. ऑक्टोबर महिन्यानंतर हि आणेवारी ठरणार आहे. उंबरठा सूत्रानुसार हि ठरणार आहे. बीड मधील अनेक मंडळातील पावसाच्या खंडाबाबत विमा कंपन्याने अपील केले होते.
इतर जिल्ह्यातील काही अपील होते ते सगळे आता फेटाळण्यात आले आहेत. 665 मंडळापैकी ज्या ठिकाणी पावसाचा खंड होता तेथील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विम्याची रक्कम देण्याचा आदेश विमा कंपन्याना दिला देण्यात आलेला आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये 15% पावसाची तूट
यापुढे पाऊस पडण्याची शक्यता असेलही परंतु हवामान विभागाच्या दृष्टीने पावसाळा हा 30 सप्टेंबर रोजीच संपला आहे. चार महिन्यात मराठवाड्यात ८५.५ टक्के पाऊस झाला सहा जिल्ह्यात सामान्यतः सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. मराठवाड्यात 15 टक्के पावसाची तूट 30 सप्टेंबर पर्यंत आहे. 679 विभागाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी 581.5 मीमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी 113% म्हणजेच 769.7 मिमी एवढा पाऊस झाला होता.
अशा करूयात कि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा होईल जेणे करून शेतकरी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी होईल.
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.