विहीर अनुदान योजना 2024 असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून vihir anudan yojana

विहीर अनुदान योजना 2024 असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून vihir anudan yojana

जाणून घेवूयात विहीर अनुदान योजना 2024 संदर्भातील सविस्तर माहिती.

तुमच्या शेताला पाणी नसेल तर हाती आलेले पिक वाया जाते त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीचे असणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या शेतात विहीर असेल तर तुम्ही तुमच्या शेतातील पिकांना पाणी देवू शकता.

विहीर खोदकाम करायची म्हटल्यास त्यासाठी बराच खर्च येतो परंतु तुम्ही जर रोजगार हमी योजनेतून या विहिरीचे काम केले तर तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकते.

हे तर सगळ्यांनाच माहित असते कि विहिरीसाठी शासनाकडून अनुदान मिळते पण विहिरीसाठी जो प्रस्ताव दाखल करावा लागतो त्यासाठी शेतकरी बांधवाना खूप शासकीय कार्यालयात खूप हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना विहिरीचा प्रस्ताव सादर करणे म्हणजे कटकटीचे काम वाटते.

विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान

विहीर अनुदान योजना 2024 ऑनलाईन अर्ज माहिती

परंतु आता विहिरीचा प्रस्ताव अगदी मोबाईलवरून सादर करता येणार आहे. अगदी काही मिनिटात हा विहिरीचा प्रस्ताव सादर करता येत असल्याने अनेक शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयातील मारावे लागणारे हेलपाटे टाळता येणार आहेत.

रोजगार हमी योजना अंतर्गत शेतीसाठी विविध योजना शासन राबवीत असते. यातील एक योजना म्हणजे विहीर होय. Maha EGS app चा उपयोग करून रोजगार हमी योजनेतून विहिरीसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

असा करा ऑनलाईन प्रस्ताव सादर.

विहीर अनुदान योजना ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा

असे करा Maha EGS app इंस्टाल.

  1. तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरळीत सुरु असल्याची खात्री करा.
  2. मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर हे ॲप ओपन करा.
  3. Google Play Store App ओपन केल्यावर सर्च बारमध्ये Maha EGS app असा शब्द टाकून सर्च करा.
  4. जसे हि तुम्ही Maha EGS app सर्च कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर हे app दिसेल ते इंस्टाल करून घ्या.

विहिरीसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करा.

  • Maha EGS app ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे लाभार्थी लॉगीन आणि दुसरा म्हणजे विभागाचे लॉगीन. लाभार्थी लॉगीन या पर्यायावर टच करा.
  •  तीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील 1)बागायती लागवड अर्ज 2)विहीर अर्ज 3)अर्जाची सद्यस्थिती. यापैकी विहीर अर्ज या पर्यायावर टच करा.

अर्जामध्ये खालील माहिती सादर करावी लागेल

  • अर्जदाराचे नाव.
  • मोबाईल नंबर.
  • जिल्हा.
  • तालुका.
  • ग्रामपंचायत.
  • गावाचे नाव.
  • मनरेगा जॉब कार्ड क्रमांक.
  • जॉब कार्ड अपलोड करणे.
  • लाभार्थ्यांची वर्गवारी निवडा.
  • ८ अ प्रमाणे एकूण जमीन. २ हेक्टरपेक्षा जास्त नसावी.
  • विहिरीचा भूमापन क्रमांक.
  • धारण क्षेत्र
  • सातबारा आणि ८ अ अपलोड करा. अनिवार्य नाही.
  • सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर.

OTP संदर्भातील माहिती

हि माहिती भरल्यावर पुढे जा या बटनावर टच करा. आता तुम्हाला प्रपत्र अ म्हणजेच संमतीपत्र दिसेल ते वाचून घ्या. पेजला खाली स्क्रोल करा आणि पुढे जा या बटनावर टच करा.

अजून एक संमतीपत्र या ठिकाणी तुम्हाला दिसेल प्रपत्र ब यामधील सर्व माहिती वाचून घ्या. पेजला थोडे खाली स्क्रोल करा आणि सर्वात शेवटी अर्जी जमा करा या बटनावर टच करा.

आता तुमच्या मोबाईलवर ६ अंकी otp पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि प्रस्तुत करा या बटनावर टच करा.

तुमचा अर्ज सादर झाला असल्याचा संदेश तुम्हाला दिसेल. अर्जाच्या संदर्भात तुम्हाला फोनवर कळविले जाईल किंवा संदेश पाठविला जाईल.

तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर केला आणि त्यानंतर तुमची विहीर योजनेसाठी निवड झाली तर तुम्हाला एक प्रास्तव गटविकास अधिकारी यांच्याकडे सदर करावा लागतो. हा प्रास्तव मोफत डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर टच करा.

विहीर अनुदान योजना अशी तपासा तुमच्या अर्जाची सद्यस्थिती

अर्ज तर तुम्ही केला आहे परंतु त्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर परत एकदा हे

  • Maha EGS app ओपन करा.
  • त्यानंतर लाभार्थी लॉगीन करा.
  • या ठिकाणी पूर्वी प्रमाणेच तीन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अर्जाची स्थिती या पर्यायावर टच करा.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • otp ची विनंती करा या बटनावर टच करा.
  • दिलेल्या चौकटीत OTP टाका आणि प्रस्तुत करा या बटनावर टच करा.

आता तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी दिसेल. एवढेच नव्हे तर प्रस्ताव कसा मंजूर केला जातो त्याचा फ्लो देखील तुम्हाला या ठिकाणी दिसेल. अर्ज ऑनलाईन सादर करतांना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर हा अर्ज डिलीट देखील केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *