सातबारे उतारे बंद होणार Land record 712

सातबारे उतारे बंद होणार Land record 712

सातबारे उतारे बंद होणार असले तरी ते शेतीचे होणार नसून ज्या गावात शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणी हे सातबारा उतारे बंद होणार आहेत.

सातबारा हा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा दस्तऐवज आहे परंतु हा सातबारा बंद होणार म्हटल्यावर शेतकरी बांधव नक्कीच विचारात पडले असतील तर मग आमच्या शेतीचे काय.

ज्या गावांचे शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणी आता सातबाऱ्या एवजी मिळकत पत्रिका मिळणार आहे म्हणजेच जे सातबारे उतारे बंद होणार आहेत ते केवळ ज्या गावात शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणचे बंद होणार आहे.

7.5 लाख सातबारा उतारे होणार बंद

सध्या ग्रामीण भागात शहरीकरण मोठ्या वेगाने होत आहे. 45 हजार गावांपैकी 4.5 हजार गावाचे शहरीकरण झाले आहे त्यामुळे या गावातील सुमारे साडेसात लाख सातबारा उतारांना मिळकत पत्रिकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहेत.

भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर या शहरांचा सध्या झपाट्याने विकास होत आहे. विशेषतः प्लॉटिंग व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात शहरीकरण जोराने होत आहे.

त्यामुळेच ग्रामीण भागाचे शहरीकरण होत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 122 नुसार जाहीर झालेल्या अधिसूचनेप्रमाणे शहरी भागाचा ठराविक सर्वे क्रमांक निश्चित केला जातो आणि त्यानुसार तेथील सातबारा बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्र तयार करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाकडून केली जाते.

डिजिटल सातबारा डाउनलोड करा केवळ 15 रुपयांमध्ये

सातबारा हा शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वाचा असतो तो कधीही बंद होण्याची शक्यता नाही. तुमच्या जमिनीचा सातबारा तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर देखील डाउनलोड करू शकता.

तुम्हाला जर डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याची पद्धत माहित नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता.

Download online digitally signed satbara ( digital 712 )

केवळ २३ रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या शेताचा डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता. हा डिजिटल सातबारा सर्व शासकीय कामांसाठी उपयोगात येते.

जुना सातबारा जुने फेरफार व जमिनीचे इतर कागदपत्रे डाउनलोड करा.

ऑनलाईन पद्धतीने करा सातबारा दुरुस्ती

बऱ्याच वेळेस सातबाऱ्यावर चुकीचे नाव येते अशावेळी शेतकरी बांधवाना शासकीय योजना असेल किंवा कर्ज असेल या योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होते. अशावेळी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागतात.

मात्र आता तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर झालेली चूक देखील ऑनलाईन पद्धतीने दुरुस्त करू शकता.

सातबारा दुरुस्त कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि त्यामध्ये दिलेल्या पद्धतीचे अनुकरण करा म्हणजे तुम्हाला तुमची सातारा दुरुस्ती करता येईल.

ऑनलाईन सातबारा दुरुस्ती जमीन कमी नावात चूक स्वतः दुरुस्त करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *