मोफत साडी योजना 2024 रेशनकार्डवर मिळणार साडी mofat sadi yojana

मोफत साडी योजना 2024 रेशनकार्डवर मिळणार साडी mofat sadi yojana

मोफत साडी योजना captive market scheme.

तुम्हाला कदाचित वाटत असेल कि लिहिण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर नक्कीच नाही. आता राशनकार्डवर मोफत साडी मिळणार आहे. या संदर्भात शासनाचा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे.

खात्री करण्यासाठी काल दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी काढण्यात आलेल्या जीआरची कॉपी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती तुम्ही बघू शकता. कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत हि मोफत साडी दिली जाणार आहे.

राशन कार्डवर कोणत्या महिला या मोफत साडीसाठीपात्र आहेत आणि कोणत्या नाहीत चला तर जाणून घेवूयात कशी आहे हि मोफत साडी योजना mofat sadi yojana.

मोफत डिजिटल सातबारा वाटप सुरु सातबारा दुरुस्तीची अशी द्या सूचना

मोफत साडी योजना Mofat sadi yojana

ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा नागरिकांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २८ नुसार एक मोफत साडी दिली जाणार आहे.

हि जी साडी दिली जाणार आहे ती वस्त्रोद्योग विभाकडून दिली जाणार आहे शिवाय हि साडी यंत्रमागावर विणलेली असणार आहे.

तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. जाणून घेवूयात या योजनेविषयी सविस्तर माहिती.

योजना स्वरूप

ज्या महिलांना हि साडी दिली जाणार आहे त्या मोफत साडी योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

  • ज्या नागरिकांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक व्यक्तींच्या यादीमध्ये कमी किंवा जास्त संख्या होऊ शकते यानुसार लाभार्थी संख्या देखील कमी किंवा जास्त होऊ शकते.
  • मोफत दिल्या जाणाऱ्या साडीची किंमत ३५५ रुपये एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच ३५५ रुपये एवढ्या किमतीची साडी मोफत दिली जाणार आहे.
  • एका वर्षातून केवळ एकदाच मोफत साडी योजनेचा लाभ मिळणार आहे. हि साडी सणासुदीच्या दिवशी वितरीत केली जाणार आहे.

तर अशा पद्धतीने आता तुमच्या गावातील राशन दुकानामध्ये लवकरच स्वस्त धन्याबारोबारीने महिलांना मोफत साडी देखील मिळणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना याचा फायदा होणार आहे.

योजनेचा जी आर पहा

mofat sadi yojna या योजना संदर्भात संदर्भात शासनाचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.

मोफत साडी योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि या संदर्भातील जी आर सविस्तरपणे वाचून घ्या.

सर्वसामान्य गरीब जनतेसाठी शासन विविध योजना राबवीत असते परंतु या योजनेची माहिती नसल्याने अनेक नागरिक अशा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असते.

अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्यासोबत कनेक्ट व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *