पिक विमा मिळवायचा असेल तर असा करा ऑनलाईन अर्ज  pik vima crop insurance 2023

पिक विमा मिळवायचा असेल तर असा करा ऑनलाईन अर्ज  pik vima crop insurance 2023

सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे पिक विमा मिळवायचा असेल तर लगेच पिक विमा कंपनीस अर्ज करा.

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

ज्या पिकांचा शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला आहे त्या पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले असेल तर लगेच पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस द्या जेणे करून तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकेल.

हि सूचना तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील पिक विमा कंपनीस देवू शकता. पिक विमा कंपनीस झालेल्या नुकसानीची सूचना कशी द्यावी या संदर्भात या लेखामध्ये अगदी तपशीलवारपणे माहिती देण्यात आलेली आहे.

हि पद्धतीचा उपयोग करून तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या शेतातील झालेल्या पिक नुकसानीचा पिका विमा कंपनीस सूचना देवू शकता.

तुमची सूचना प्राप्त झाल्यावर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेताला भेट देतील आणि त्यानंतर तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकेल.

फळपिक विमा 2023 निधी आला पहा शासनाचा नवीन जी आर

पिक विमा मिळवायचा असेल crop insurance app वरून करता येतो ऑनलाईन अर्ज

crop insurance app एक शासकीय ॲप्लिकेशन आहे या ॲपचा उपयोग करून शेतकरी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस देवू शकतात.

परंतु तुम्ही जर तुमची पिक विमा काढलेली पावती बघितली तर त्यापावतीच्या सर्वात खाली तुम्ही कोणत्या कंपनीकडून तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्या कंपनीचे नाव दिलेले असते.

त्या कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ॲपचा उपयोग करून देखील तुम्ही पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची माहिती देवू शकता.

crop insurance app चा फायदा असा आहे कि यामध्ये तुम्ही कोणत्याही पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना देवू शकता. एकदा का तुम्ही तुमच्या पिक नुकसानीचा क्लेम या शासकीय ॲपद्वारे केला कि मग शासनाकडून संबधित पिक विमा कंपनीस शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सुचने संदर्भात कळविले जाते आणि मग कंपनी तत्काळ कार्यवाहीस लागते.

तुम्ही तुमच्या पिक विमा पावतीवर उल्लेख केलेल्या कंपनीच्या वेबसाईटवर देखील पिक नुकसानीची माहिती देवू शकता.

crop insurance app चा उपयोग करून ऑनलाईन अर्ज कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

universal sompo वेबसाईटचा उपयोग करून अशी द्या कंपनीस पिक नुकसानीची माहिती

वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पिक विमा कंपन्या नेमून दिलेल्या आहेत. universal sompo या वेबसाईटचा उपयोग करून पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कशी सादर करावी लागते जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.

crop insurance app आणि universal sompo यामधील फरक असा आहे कि crop insurance app मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतामध्ये जावून पिकांचा लाईव्ह फोटो आणि व्हिडीओ काढावा लगतो तरच तुमची पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस पाठविली जाते.

परंतु universal sompo या वेबसाईटवर पिक नुकसानीची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष शेतामध्ये जाण्याची गरज राहत नाही. पिक विमा पावतीद्वारे देखील तुम्ही तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस देवू शकता.

पिक विमा मिळवायचा असेल अशी द्यावी लागते पिक नुकसानीची विमा कंपनीस सूचना

  • गुगलच्या सर्च बारमध्ये universal sompo असा शब्द टाकून सर्च करा.
  • त्यानंतर universal sompo या पिक विमा कंपनीची वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन झालेली असेल.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर पेजला थोडे खाली स्क्रोल केल्यावर pmfby कंपनीचा लोगो दिसेल त्यावर टच करा किंवा क्लिक करा.
  • register claim वर टच करताच proceed to intimate claim अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • OTP साठी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Send OTP या बटनावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाकून proceed या बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या तुम्हाला तुम्ही केलेल्या पिक विमा अर्जासंदर्भात संपूर्ण माहिती दिसेल योग्य त्या ठिकाणी योग्य माहिती भर आणि तुमचा अर्ज सादर करून द्या.

हा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

तर अशा पद्धतीने पिक विमा मिळवायचा असेल तर लगेच अर्ज करून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *