अपंग कर्ज योजना apang karj yojana 2023
तुम्ही जर अपंग असाल किंवा तुमच्या घसरतील व्यक्ती किंवा तुमचे मित्र अपंग असतील तर अशा व्यक्तींना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून बीज भांडवल मिळते. जाणून घेवूयात
या बीजभांडवलाच्या सहाय्याने अशा बेरोजगार व्यक्ती त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात. या योजनेचे स्वरूप कसे आहे. योजनेची पात्रता काय आहे या संदर्भात आपण या ठिकाण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल.
अनेक दिव्यांग बंधू त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छित असतात परंतु आर्थिक भागभांडवल न मिळाल्याने ते हा व्यवसाय सुरु करू शकत नाहीत.
अशावेळी शासकीय योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच प्रगती करणे शक्य होते. त्यामुळे तुम्ही जर अपंग असाल तर तर नक्कीच या योजनेविषयी तुम्हाला माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
अपंग कर्ज योजना स्वरूप
या योजना अंतर्गत अपंग व्यक्तींना बीजभांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदरील योजना हि राज्य शासन राबवीत असते.
जे अपंग बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे. कोणताही व्यवसाय, उद्योग, शेती पूरक व्यवसाय दिव्यांग बंधू करू शकतात.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कोणत्या व्यक्ती आहेत. अर्थातच ज्या व्यक्ती अपंग आहेत त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात परंतु अपंगामध्ये देखील प्रकार आहेत.
त्यामुळे खालील प्रकारातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात.
अंध.
कर्णबधीर.
अल्पदृष्टी.
अस्थीव्यंग.
मतीमंद
वरील प्रकारातील व्यक्ती ह्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात.
बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आव्हान bij bhandval karj yojana
काय आहेत योजनेच्या अटी
सगळ्यात महत्वाची पहिली अट म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्जदारास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक विहित नमुन्यातील अर्ज संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.
अर्जदाराच्या अपंगत्वाची टक्केवारी हि 40 टक्क्यापेक्षा जास्त असावी.
अर्जदाराचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
१८ ते ५० या वयोगटातील अर्जदार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे.
किती मिळणार अनुदान.
अपंग बीजभांडवल योजना अंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या २० टक्के किंवा जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत लाभ या योजना अंतर्गत मिळू शकतो.
अर्जदारास जो लाभ दिला जातो तो अनुदान बीज भांडवल स्वरुपात दिला जातो आणि जी बाकी रक्कम म्हणजे ८० टक्के भाग हा कर्जाच्या स्वरुपात अर्जदारास दिला जातो.
तुम्ही जर अपंग असाल किंवा तुमच्या घरातील सदस्य अपंग व्यक्ती असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
जिल्हा समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
अशा पद्धतीने अपंग कर्ज योजना अंतर्गत लाभ घेवून उद्योग व्यवसाय सुरु करता येतो.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अपंग कर्ज योजनेसाठी अर्ज करता येतो. अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
अपंग व्यक्तींना उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या २० टक्के किंवा जास्तीत जास्त ३० हजार रुपये कर्ज मिळते.