मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान mini tractor yojna

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान mini tractor yojna

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु झाले असून तुम्हालाहि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज सदर करून द्या कारण या योजनेसाठी अर्ज मागविणे सुरु आले आहे.   

कोणत्या व्यक्ती पात्र आहेत, अर्ज कोठे करावा, किती अनुदान मिळते या संदर्भातील सविस्तर माहिती याठिकणी जाणून घेवूयात

शेतामध्ये बहुतांश कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. त्यामूळे अनेकांना ट्रॅकर खरेदी करण्याची इच्छा असते. परंतू अर्थिक पाठबळ नसल्याने अनेकजण इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करु शकत नाहीत.

मोबाईलद्वारे ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी कशी करावी A to Z माहिती new online voter registration form 6

अशावेळी शासकिय अनुदानावर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करु शकता.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लाभार्थी पात्रता

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवबौध्द किंवा अनुसुचित जाती घटकातील अर्जदार असणे आवश्यक आहे.

समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते. मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 9 ते 18 HP चे मिनी ट्रॅक्टर दिले जाते.

परत एकदा लक्षात असू दया कि केवळ नवबौद्ध व अनुसूचित घटकातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळतो.

अर्ज करण्याआधी पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे कारण सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

मिनी ट्रॅक्टर योजनेचे स्वरूप

नोंदणीकृत बचत गटांतील व्यक्तींना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो.

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान मिळते.

ज्या बचत गटांना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या बचत गटामध्ये 80 टक्के सदस्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचगटांना देण्यात येतो.

ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनावर 3.15 लाख रूपये अनुदान देण्यात येते.

व्हिडीओ पहा.

कोठे कराल अर्ज

मिनी ट्रॅक्टरयोजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाकल्याण तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध असुन पात्र बचत गटांनी आपापले अर्ज सादर करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागु आहे. ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामूळे अर्जदारांनी आपापल्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

जालना जिल्ह्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 ही आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लगेच अर्ज सादर करून द्या.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

२० जानेवारी २०२४ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कोण अर्ज करू शकतो?

नवबौध्द किंवा अनुसुचित जाती या घटकांतील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

किती अनुदान मिळते?

३.१५ लाख रुपयांचे अनुदान मिनी ट्रॅक्टर योजना व त्याचे उपसाधने खरेदी करण्यासाठी मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *