अंगठा किंवा बोट स्कॅन होत नाही तरी देखील मिळणार राशन new epos machine

अंगठा किंवा बोट स्कॅन होत नाही तरी देखील मिळणार राशन new epos machine

राशन दुकानदारांना मिळणार new epos machine जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

ग्रामीण भागातील महिला शेतात कष्टाची कामे करतात. हि कामे करत असतांना त्यांच्या हातावरील रेषा धुसुर होतात किंवा नाहीशा पावतात. अशावेळी राशन दुकानामध्ये स्वस्त धान्य आणण्यासाठी गेले कि मग बोट किंवा अंगठा स्कॅन होत नाही. त्यामुळे अशा गरीब महिलांना धान्य मिळत नाही.

ग्रामीण भागामध्ये राशन दुकानामध्ये बोट स्कॅन न होणे हि खूप मोठी डोकेदुखी बनलेली होती. शेतीमध्ये काम करत असतांना विशेषतः काम जर सोंगणीचे असेल तर त्याचा परिणाम थेट हातावर होत असल्याने आताच्या बोटांवरील ठसे स्कॅनर मशीनवर उमटत नसल्याने अनेकांना धान्य मिळत नव्हते.

शिवाय रेशन दुकानामध्ये बोटांचे ठसे स्कॅन करण्यासाठी 2 G E pos machine असल्याने इंटरनेट कनेक्टीव्हिटी कमी असल्याने दुकानासमोर रंगाच्या रांगा लागलेल्या असत.

बांधकाम कामगार संसार बाटली जी आर डाउनलोड करा sansar batli GR

new epos machine इंटरनेट हळू चालत असल्याने येत होत्या अडचणी

आता मात्र या डोकेदुखीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. रेशन दुकानामध्ये आता ४ जी इ पॉस मशीन  4G e pos machine व सोबत इरीस स्कॅन मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तुमच्या घरातील महिलांचे बोट स्कॅन होत नसेल तर आता धान्य मिळणार नाही याची चिंता करण्याचे कारण उरले नाही.

2 जी इंटरनेट सेवेमुळे जुने इ पॉस मशीन अगदी हळू चालायचे त्यामुळे नागरिकांना धान्य मिळविण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता शासनाने राशन दुकानदारांना नवीन 4G ई पॉस मशीन व इरीस मशीन उपलब्ध करून दिल्याने राशन दुकानदारांसोबत नागरिकांना देखील सोय होणार आहे.

जुन्या ई पॉस मशीन ह्या 2 जी व 3 जी इंटरनेट सेवेवर चालणाऱ्या होत्या. ज्या संस्था ह्या मशीन पुरवठा करत होत्या त्यांचा कालावधी संपला असून आता यासाठी नवीन निविदा प्रक्रिया शासनाच्या वतीने राबविण्यात आली आहे.

बोटे स्कॅन झाले नाही तरी मिळेल राशन

नवीन राबविलेल्या निविदा प्रक्रीयानुसार ओयॅस्तिस, विजनटेक आणि इंअैग्रा या तीन 3 सिस्टम इंटीग्रेटर  संस्थाची निवड करण्यात आली असून या संस्था हे नवीन 4G e pos machine व सोबत इरीस स्कॅन मशीन पुरवठा करणार आहे.

आधारवर फिंगर प्रिंट्स पडताळणी करण्यास अडचण येत असेल तर इरीस मशीनद्वारे केले जाणार स्कॅन.

राशन दुकानामध्ये एखाद्या महिलेचा किंवा पुरुषांच्या हाताच्या बोटाचे ठसे स्कॅनर मशीनवर उमटत नसेल तर इरीस मशीनने त्यांच्या डोळ्याचे स्कॅन करून त्यांना धान्य पुरवठा केला जाणार आहे.

त्यामुळे आता राशन दुकानामध्ये तुमचे बोट येत नसेल तर चिंता करण्याचे कारण नाही.

महासंवाद लिंक

e pos machine खालील व्हिडीओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *