Phule amrutkal mobile app दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी फुले अमृतकाळ ॲपचे लोकार्पण

Phule amrutkal mobile app दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी फुले अमृतकाळ ॲपचे लोकार्पण

पहा कसे आहे Phule amrutkal mobile app

तुम्ही जर दुग्धव्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी फुले अमृतकाळ मोबाईल ॲप Phule amrutkal mobile app फायद्याचे ठरणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी पळून दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतीच्या बरोबरीने दुग्धव्यवसायामुळे शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळते शिवाय शेतीमध्ये तोटा आल्यास या व्यवसायातून भरून निघतो.

बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने अनेकजण  दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत. दुग्धव्यवसाय करत असतांना जनावरांना होणारे आजार या संबधी जागरूक असणे खूपच महत्वाचे आहे नसता गुरांना आजार झाल्यास ते दगावण्याची जास्त शक्यता असते आणि असे जर घडले तर दुग्धव्यवसाय तोट्यात येतो.

दुग्धव्यवसाय करत असतांना पासुधानासाठी लागणारा चारा आणिज पाणी या बाबी खूपच महत्वाच्या आहे कारण यामध्ये बदल झाला तर यामुळे सरळ दुधावर परिणाम होतो.

अर्थात यासाठी पशुवैद्कीय यांचा सल्ला घेणे गरजेचे असते. पशुवैदकीय सल्ला मिळणे आता अधिक सोपे झाले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने फुले अमृतकाळ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.

crop insurance application pdf 2024 नुकसान भरपाई अर्ज असा भरा

काय काम करेल हे फुले अमृतकाळ मोबाईल ॲप Phule amrutkal mobile app

अतिवृष्टी होणे, ढगफुटी होणे, तापमान वाढणे, उष्माघात होणे इत्यादीमुळे जनावरांच्या दुधावर थेट परिणाम होतो.

या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकरी बांधवाना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.

गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत.

अधिकृत माहिती पहा

कसे कराल अमृतकाळ मोबाईल ॲप डाउनलोड

तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर हे ॲप उघडा.

Phule amrutkal असा शब्द टाकून सर्च करा.

हे अमृतकाळ मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये install करून घ्या.

लॉगीन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करून otp मिळवा या बटनावर टच करा.

आता एक OTP तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका व लॉग इन करा या पर्यायावर टच करा.

आता मालकाचे नाव, भौगोलिक स्थान व पत्ता टाईप करून जतन करा या पर्यायावर टच करा. या ठिकाणी पत्यासाठी तुम्ही गुगल mapची सहाय्यता घेवू शकता.

अशा पद्धतीने तुम्हाला या मोबाईल ॲपमध्ये देशी गाई, संकरित गाई व म्हशी संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.

ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहे त्यांनी या Phule amrutkal mobile app ॲपचा नक्की उपयोग करावा.

गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *