लेक लाडकी योजनेसाठी lek ladki yojana शासनाकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
शासनाच्या वतीने लेक लाडकी ही योजना सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
तुमच्या घरात देखिल 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म जाला असेल तर लगेच तुमचा देखिल लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करा.
तुमच्या घरामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेवू शकता आणि शासनाकडून 1 लाख 1 हजार रुपयांचे अनुदान मिळवू शकता.
नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्या मार्फत राज्यातील 36 जिल्हयांना 19 कोटी 70 लाख रूपये निधि वितरित करण्यांत आले आहे.
याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही शासनाच्या वतीने करण्यांत येत आहे.
lek ladki yojana खालीलप्रमाणे मिळेल अनुदान
लेक लाडकी योजना अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.
मुलगी जन्मल्यानंतर 5000 रुपये.
मुलगी इयत्ता पहिलीमध्ये शिकायला लागल्यावर 6000 रुपये.
सहावीत गेल्यावर 7000 हजार रुपये मिळतात.
अकरावीत 8000 रुपये.
तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये 101000 एवढी रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येते.
लेक लाडकी योजना २०२३ पूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणून ओळखली जात होती. या योजनेस चांगला प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने या योजनेस लेक लाडकी हे नवीन नाव दिले आहे lek ladki yojana.
कोठे करावा लागेल अर्ज
महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजना खूप प्रभावीपणे राबविली जात आहे. तुमच्या घरामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर लेक लाडकी योजनेचा अर्ज तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे सादर करून द्या.
योजनेचा अर्ज मी खास तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. खालील लिंकवर क्लिक करून हा अर्ज pdf मध्ये डाउनलोड करून घ्या आणि सादर करून द्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
लेक लाडकी योजना lek ladki yojana निधी संदर्भातील अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.